- लस उत्पादन ही विशेष प्रक्रिया आहे. त्यामुळे एका रात्रीतून उत्पादन वाढवणं शक्य नाही, असं आदर पूनावाला म्हणाले.
- जगभरातली सगळ्यात मोठी लस बनवणारी कंपनी म्हणून ओळख असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या आदर पूनावाला यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांना धमक्या मिळत असल्याचा गंभीर खुलासा केलेला होता.
- आदर पूनावाला हे सध्या इंग्लंडमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.देशात कोरोनाच्या लशींचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर आपल्यावर मोठ्या प्रमाणात दबाव असल्याचं पूनावाला यांनी लंडनमध्ये एका मुलाखतीत सांगितलं.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना लसींच्या पुरवठ्याबाबत सीरम इन्स्टिट्यूटच्या आदर पूनावाला यांनी ट्विटर वर पत्र लिहिलं आहे .केंद्र सरकारने पीआयबीमार्फत लसींच्या पुरवठ्याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. यानंतर बऱ्याच घडामोडी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असल्याने आदर पूनावाला यांनी कंपनीला 26 कोटी डोसची ऑर्डर मिळाली असल्याचं सांगितलं आहे.लस उत्पादन ही विशेष प्रक्रिया आहे. त्यामुळे एका रात्रीतून उत्पादन वाढवणं शक्य नाही, असेही ते म्हणाले आहेत .Serum Institute working closely with govt, received all kinds of support: Adar Poonawalla
पुनावाला यांनी एक पत्र ट्वीट करत म्हटलं आहे की, आम्ही गेल्या वर्षी एप्रिलपासून भारत सरकारबरोबर काम करत आहोत. आम्हाला वैज्ञानिक, नियामक आणि आर्थिक असे सर्व प्रकारचे समर्थन मिळाले आहे.
माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्यामुळे मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. सर्व प्रथम, लस उत्पादन ही एक विशेष प्रक्रिया आहे. त्यामुळे रात्रीतून उत्पादन वाढविणे शक्य नाही.
आपल्याला हे देखील समजून घेण्याची गरज आहे की भारताची लोकसंख्या मोठी आहे आणि सर्व प्रौढांसाठी पुरेसे डोस तयार करणे हे सोपे काम नाही, अगदी प्रगत देश आणि कंपन्या तुलनेने कमी लोकसंख्या असतानाही संघर्ष करीत आहेत.
आम्हाला आतापर्यंत 26 कोटी डोसची ऑर्डर मिळाली असून त्यापैकी 15 कोटीहून अधिक डोस पुरवण्यात आले आहेत.
भारत सरकारकडून पुढील काही महिन्यात 11 कोटी डोससाठी 1,732.50 कोटी रुपयांची 100 टक्के आगाऊ रक्कमही मिळाली आहे.
दुसऱ्या टप्प्यात 11 कोटी डोस राज्य आणि खासगी रुग्णांलयात पुरवण्यात येतील’ अशी माहिती पूनावाला यांनी एका निवेदनात दिली.
‘लशीचं उत्पादन करणं ही एक विशेष प्रक्रिया आहे, त्यामुळे एका रात्रीत उत्पादन वाढणं शक्य नाही. तसंच भारताची लोकसंख्याही मोठी आहे.
सर्व लोकांसाठी पुरेसे डोस तयार करणं सोपं काम नाही. तुलनेने कमी लोकसंख्या असलेले अगदी मोठे प्रगत देश आणि कंपन्याही यासाठी संघर्ष करत असल्याचं’, आदर पूनावाला यांनी सांगितलं.
पुढील काही महिन्यांत राज्य आणि खासगी रुग्णालयांसाठी आणखी 11 कोटी डोस पुरवल्या जातील.
आम्हाला हे समजते की प्रत्येकाला लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी असे वाटते. तेही आमचे प्रयत्न आहेत आणि ते मिळवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आम्ही आणखी कठोरपणे काम करू आणि कोविड विरुद्धचा भारताचा लढा मजबूत करू, असं त्यांनी म्हटलं आहे.