• Download App
    सिरम इन्स्टिट्यूट केंद्र सरकारला जूनमध्ये १० कोटी कोरोना लसी देणार, अमित शहा यांना दिले पत्र|Serum Institute to deliver 100 million corona vaccine in June, letter to Amit Shah

    सिरम इन्स्टिट्यूट केंद्र सरकारला जूनमध्ये १० कोटी कोरोना लसी देणार, अमित शहा यांना दिले पत्र

    देशात करोना लशींचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरण मोहीम मंदावली आहे. मात्र, जून महिन्यात हा तुटवडा कमी होणार आहे. सिरम इन्स्टिट्यू ऑफ इंडियाने केंद्र सरकारला जून महिन्यात १० कोटी लस देणार असल्याचे सांगितले आहे. याबाबतचं पत्र सिरम इन्स्टिट्युटने गृहमंत्री अमित शाह यांना दिलं आहे.Serum Institute to deliver 100 million corona vaccine in June, letter to Amit Shah


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशात करोना लशींचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरण मोहीम मंदावली आहे. मात्र, जून महिन्यात हा तुटवडा कमी होणार आहे. सिरम इन्स्टिट्यू ऑफ इंडियाने केंद्र सरकारला जून महिन्यात १० कोटी लस देणार असल्याचे सांगितले आहे.

    याबाबतचं पत्र सिरम इन्स्टिट्युटने गृहमंत्री अमित शाह यांना दिलं आहे.सिरम कंपनीच्या नियामक विभागाचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जून महिन्यात आम्ही १० कोटी कोविशिल्ड व्हॅक्सिनची निर्मिती करत पुरवठा करणार आहोत.



    मे महिन्यात ६.५ कोटी डोसची निर्मिती केली होती आणि पुरवठा केला होता. देशातील मागणी पाहता आम्ही लशींचे उत्पादन वाढवलं आहे. सिरम इन्स्टिट्युट देशातील नागरिकांची काळजी घेण्यास कटीबद्ध आहे.

    आमची संपूर्ण टीम सरकारच्या खांद्याला खांदा लावून करोनाविरुद्ध लढण्यास मैदानात उतरली आहे. आम्हाला विधायक कामासाठी केंद्र सरकारकडून पूर्ण पाठिंबा मिळत आहे. येत्या काळात आम्ही उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

    पुण्यातील कोविशिल्ड व्हॅक्सिन निर्मिती कंपनीत दिवसरात्र काम सुरु असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. देशातील करोना लशींची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असंही त्यात सांगण्यात आलं आहे.

    यापूर्वी सिरमने जून महिन्यात ६.५ कोटी लशींची निर्मिती केली जाईल, असं सांगितलं होतं. तसेच जुलैमध्ये ७ कोटी आणि आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये १० कोटी लशींची निर्मिती केली जाईल असं सांगितले होते.

    Serum Institute to deliver 100 million corona vaccine in June, letter to Amit Shah

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला