• Download App
    सप्टेंबर महिना धोक्याचा : कोरोनाची तिसरी लाट येण्याचा निती आयोगाचा इशारा ; दररोज ४ ते ५ लाख रुग्ण वाढणार। September Month is dangerous: Niti Commission warns of third wave of corona; 4 to 5 lakh patients will be added every day

    सप्टेंबर महिना धोक्याचा : कोरोनाची तिसरी लाट येण्याचा निती आयोगाचा इशारा ; दररोज ४ ते ५ लाख रुग्ण वाढणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा निती आयोगाने दिला आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये लाट येऊ शकते, असे आयोगाने बजावले आहे. या लाटेत दररोज चार ते पाच लाख रुग्णांची नोंद होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. September Month is dangerous: Niti Commission warns of third wave of corona; 4 to 5 lakh patients will be added every day

    देशात दोन लाख आयसीयू बेड्सची गरज भासू शकते, असेही आयोगाने सांगितले आहे. तसेच यंत्रणेला काही शिफारशीही केल्या आहेत.
    देशात सप्टेंबरमध्ये ४ ते ५ लाख दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद होऊ शकते. प्रत्येकी १०० कोरोना रुग्णांपैकी २३बाधितांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागू शकते. आतापासून २ लाख आयसीयू बेड्स तयार ठेवण्याच्या सूचना आयोगानं केंद्र सरकारला केली आहे.



    द इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार, दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावानंतर रुग्णालयांत कोरोना बेड्स वेगळे ठेवण्याची शिफारस केली. आयोगानुसार, कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचा सामना करणाऱ्यासाठी आधीपासूनच तयारी करावी लागणार आहे. सप्टेंबरपर्यंत दोन लाख आयसीयू बेड्स तयार करणं अत्यंत आवश्यक आहे.१.२ लाख व्हेंटिलेटर असणारे आयसीयू बेड, ७ लाख ऑक्सिजन बेड्स आणि १० लाख कोविड आयसोलेशन केअर सेंटरची नितांत गरज आहे.

    बूस्टर डोस देण्याचा विचार नाही : निती आयोग

    कोविड 19 लसीसाठी बूस्टर डोसचा विचार केंद्र सरकारने केला नसल्याची माहिती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही के पॉल यांनी दिली. लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचा हवाला देऊन सांगितले की, या संदर्भात अशी शिफारस केली नाही.

    बूस्टर डोसची सध्या गरज नाही : व्ही. के. पॉल

    व्ही के पॉल यांनी सांगितले, की “बूस्टर डोसची वेळ आणि आवश्यकता यामागील विज्ञान विकसित होत आहे. दोन डोसमधील अंतर वेगवेगळे आहे. यावर संशोधन केलं जात आहे.” ते पुढे म्हणाले की भारतातील प्रौढ लोकसंख्येला लसीचे दोन डोस देऊन लसीकरण करणे ही आतापर्यंतची मोठी चिंता आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना पॉल म्हणाले की, जगातील काही देशांनी बूस्टर डोस देऊन लसीकरण सुरू केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या विषयावर शिफारस केलेली नाही.

    September Month is dangerous : Niti Commission warns of third wave of corona; 4 to 5 lakh patients will be added every day

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसेत वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी चौथी अटक; आरोपींनी मृताच्या घराची तोडफोड केली

    Bangladesh : बांगलादेशची इंटरपोलकडे हसीनांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसची मागणी; 9 महिन्यांपासून भारतात आहेत माजी पंतप्रधान

    दिल्ली महापौर निवडणुकीतून आम आदमी पार्टीची माघार; पराभवाच्या खात्रीने सुचला राजकीय विचार!!