वृत्तसंस्था
रांची – ज्या झारखंडचे काँग्रेस आमदार तालिबानचे उघड समर्थन करायला बाहेर पडतात त्या झारखंड विधानभवनात नमाज पठणासाठी स्वतंत्र दालन देण्याचा निर्णय हेमंत सोरेन यांच्या सरकारने घेतला आहे.Separate hall for prayers in Jharkhand Legislative Assembly; Decision of Hemant Soren government; Strong opposition from the state
त्यावरून राज्यात प्रचंड विरोध उसळला असून नमाज पठणासाठी स्वतंत्र दालन देता तर इतर धर्मीयांसाठी प्रार्थनास्थळ का नाही, असे सवाल सोशल मीडियातून उठले आहेत. भाजपने तर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोधही केला आहे.
झारखंड विधानसभेच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार विधानसभेचे उप सचिव नवीन कुमार यांच्या सहीने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे, की नव्या विधानसभा भवनात नमाज पठणासाठी नमाज कक्ष म्हणून दालन TW-348 उपलब्ध करून दिले जात आहे.
या निर्णयावर भाजपचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास, माजी विधानसभा अध्यक्ष सी. पी. सिंग, माजी मंत्री भानू प्रताप शाही यांनी तीव्र आक्षेप घेतला असून त्यांनी हेमंत सोरेन सरकार मुसलमानांचे लांगूलचालन करीत असल्याचा आरोप केला आहे.
तर माजी विधानसभा अध्यक्ष सी. पी. सिंग यांनी विधान भवन परिसरात खासगी खर्चाने हनुमान मंदिर बांधण्याची तयारी दाखविली आहे. नमाजसाठी स्वतंत्र दालन दिले जाणार असेल, तर इतर धर्मीयांसाठी देखील प्रार्थनास्थळे बांधली पाहिजेत, असे सी. पी. सिंग यांनी सांगितले.
झारखंड विधानसभेतील काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी कालच तालिबानचे उघड समर्थन केले होते. तालिबानच्या राजवटीत अफगाण नागरिक खूश आहेत, असा दावा त्यांनी केला होता.
Separate hall for prayers in Jharkhand Legislative Assembly; Decision of Hemant Soren government; Strong opposition from the state
महत्त्वाच्या बातम्या
- मराठी भाषिकांचे ‘बेळगाव’ अजूनही कर्नाटकातच; महापालिका आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडेही जनतेचे लक्ष
- Tokyo Paralympics 2020 : कोट्यवधींची रोख बक्षिसे, सरकारी नोकरी, हरियाणा सरकारतर्फे पॅरालिम्पिक खेळाडूंचा असा होतोय सन्मान
- उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता येण्याचे सर्वै येताच मायावती म्हणाल्या, दलित, आदिवासी, पिछडे, मुस्लीम आणि ब्राह्मणही बसपच्या पाठीशी
- संयुक्त किसान मोर्चा पंजाबमध्ये निवडणूक प्रचारापासून दूर राहणार… पण का??; रहस्य नेमके काय…??