• Download App
    हिंदूंना धमकवणारे पंजाबचे माजी पोलीस महासंचालक मोहम्मद मुस्तफांना तुरुंगात पाठवा; कॅप्टन अमरिंदरसिंग यांची मागणी । Send former Punjab Director General of Police Mohammad Mustafa to jail for threatening Hindus; Demand of Captain Amarinder Singh

    हिंदूंना धमकवणारे पंजाबचे माजी पोलीस महासंचालक मोहम्मद मुस्तफांना तुरुंगात पाठवा; कॅप्टन अमरिंदरसिंग यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    चंडीगड : पंजाब मध्ये हिंदू समाजाला धमकी देणाऱ्या माजी पोलीस महासंचालक मोहम्मद मुस्तफा यांची रवानगी लवकरात लवकर पोलीस कोठडीत करा, अशी आग्रही मागणी पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे प्रमुख कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी केली आहे. Send former Punjab Director General of Police Mohammad Mustafa to jail for threatening Hindus; Demand of Captain Amarinder Singh

    मोहम्मद मुस्तफा हे पंजाब मधले जातीय सलोख्याचे वातावरण बिघडवत आहेत. हिंदू समाजाला ते धमकी देत आहेत. हे पंजाबची जनता खपवून घेणार नाही असा इशारा देखील कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी दिला आहे. अमरिंदर सिंग यांनी पंजाब लोक काँग्रेसच्या 22 उमेदवारांची यादी आज जाहीर केली. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मोहम्मद मुस्तफा आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्या सारखे जातीयतने पछाडलेले लोक पंजाबच्या शांततेसाठी अतिशय धोकादायक आहेत. हे मी काँग्रेसमध्ये असताना देखील सांगितले होते. आता तर मोहम्मद मुस्तफा उघडपणे हिंदू समाजाला धमकी देतात, हे पंजाबची जनता सहन करणार नाही. त्यांना ताबडतोब तुरुंगाची हवा खायला लावली पाहिजे, अशी आग्रही मागणी कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी केली आहे.

    – मोहम्मद मुस्तफांचा धमकीचा व्हिडिओ व्हायरल

    पंजाब मध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचे सल्लागार आणि पंजाबचे माजी पोलीस महासंचालक मोहम्मद मुस्तफा यांनी हिंदूंना धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.



    मोहम्मद मुस्तफा आहे पंजाबचे पोलीस महासंचालक तर होतेच याखेरीज ते पंजाबच्या विद्यमान मंत्री आणि मलेरकोटला विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसचे उमेदवार रजिया सुलतान यांचे पती आहेत. मोहम्मद मुस्तफा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात त्यांनी हिंदू समाजाला धमकी दिली आहे. मोहम्मद मुस्तफा म्हणतात, की मी कौमी फौजदार आहे. मी मतांसाठी लढत नसून माझ्या कौमसाठी लढतोय. मी पंजाब सरकारला इशारा देतो, की माझ्याबरोबर हिंदूंना जलसा करण्याची परवानगी दिली तर याद राखा मी असे वातावरण निर्माण करीन की सरकारला सांभाळणे मुश्कील होईल, अशी धमकी मोहम्मद मुस्तफा यांनी दिली आहे.

    मोहम्मद मुस्तफा यांच्या या धमकीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर पंजाब मध्ये व्हायरल झाल्यानंतर राज्यात मोठा तणाव उत्पन्न झाला आहे. अकाली दल, भाजप, आम आदमी पार्टी या तिन्ही पक्षांनी मोहम्मद मुस्तफा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे करण्याची मागणी पंजाब सरकारकडे केली आहे. पंजाबच्या पोलीस महासंचालक पदावर राहिलेल्या व्यक्तीने अशी जातीय हिंसाचाराची धमकी द्यावी आणि ती काँग्रेस सरकारने ऐकून घ्यावी, याचा सर्व राजकीय पक्षांनी निषेध केला आहे. येत्या 24 तासात मोहम्मद मुस्तफा यांच्यावर कारवाई झाली नाही तर निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा देखील भाजप आणि अकाली दल यांनी दिला आहे.

    Send former Punjab Director General of Police Mohammad Mustafa to jail for threatening Hindus; Demand of Captain Amarinder Singh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य