• Download App
    संरक्षणक्षेत्रात आत्मनिर्भरतेचा गजर, १०८ प्रकारच्या लष्करी साहित्याच्या आयातीवर केंद्राची बंदी|Self-reliance in the defense sector, ban on import of 108 types of military equipment

    संरक्षणक्षेत्रात आत्मनिर्भरतेचा गजर, १०८ प्रकारच्या लष्करी साहित्याच्या आयातीवर केंद्राची बंदी

    संरक्षण क्षेत्रात सुरू झालेला आत्मनिर्भरतेचा गजर कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारने लष्कराकडून वापरल्य जाणााऱ्या १०८ प्रकारच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. या वस्तूंचे उत्पादन भारतामध्येच होणार आहे.Self-reliance in the defense sector, ban on import of 108 types of military equipment


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रात सुरू झालेला आत्मनिर्भरतेचा गजर कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारने लष्कराकडून वापरल्य जाणााऱ्या १०८ प्रकारच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. या वस्तूंचे उत्पादन भारतामध्येच होणार आहे.

    मोदी सरकार संरक्षण क्षेत्रात भारताला स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध योजना आखत आहे. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया यासारखे उपक्रमही राबविण्यात येत आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने लष्कराकडून वापरल्या जाणाऱ्या १०८ साहित्याची आयात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.



    या साहित्याची यादी जाहीर करण्यात आली आहे.डिसेंबर २०२१ ते २०२५ पर्यंत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यामुळे लष्करी साहित्याच्या उत्पादनात देश आत्मनिर्भर होऊ शकेल.

    त्याचबरोबर भारतीय बनावटीच्या या साहित्याची निर्यातही होऊ शकेल. डिफेन्स अ‍ॅक्विझिशन प्रोसीजरनुसार भारतीय कंपन्यांकडून या १०८ वस्तूंचे उत्पादन केले जाणार आहे.
    गेल्या वर्षीही केंद्र शासनाने काही वस्तूंची यादी जाहीर केली होती.

    त्या वस्तू आता भारतामध्ये बनविण्यास सुरूवात झाली आहे. या १०१ वस्तू आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत बनत आहेत. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये विशेष प्रकारची हेलिकॉप्टर्स, अत्याधुनिक छोटी जहाजे,टॅँक इंजिन्स, मध्यम पल्याचे रडार,

    मध्यम पल्याची जमीनीवरून जमीनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे, अ‍ॅँटी मटेरिअल रायफल्सचा समावेश आहे. पहिल्या यादीमध्ये तोफा, क्षेपणास्त्रनाशक, क्रुझ मिसाईल, हलकी लढाऊ विमाने, लांब पल्याची क्रुझ मिसाइल्स, कम्युनिकेशन सॅटेलाईट, मल्टी बॅरेल रॉकेट लॉँचर, स्निपर रायफल्स यांचा समावेश होता.

    Self-reliance in the defense sector, ban on import of 108 types of military equipment

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार