• Download App
    किरण रिजीजू यांची धडाकेबाज कामगिरी पाहून सरन्यायाधिश म्हणाले, मला वाटले ते तर ऑक्सफोर्डमध्ये शिकलेत, नंतर समजले गावातील शाळेत घेतले शिक्षण|Seeing Kiran Rijiju's flamboyant performance, the Chief Justice said, "I thought he was educated in Oxford, then he understood that he was educated in a village school."

    किरण रिजीजू यांची धडाकेबाज कामगिरी पाहून सरन्यायाधिश म्हणाले, मला वाटले ते तर ऑक्सफोर्डमध्ये शिकलेत, नंतर समजले गावातील शाळेत घेतले शिक्षण

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजीजू यांची धडाकेबाज कामगिरी पाहून मला वाटले ते ऑक्सफोर्डमध्ये शिकले असावेत. नंतर समजले की त्यांचे शिक्षण गावातील शाळेत झाले असून दहावीत गेल्यावर त्यांनी पहिल्यांदा गावात वीज पाहिली. यावर किरण रिजीजू यांनी सांगितले की मी शासकीय शाळेत शिकलो असून मी दहावीत असताना माझ्या गावात पहिल्यांदा वीज आली.Seeing Kiran Rijiju’s flamboyant performance, the Chief Justice said, “I thought he was educated in Oxford, then he understood that he was educated in a village school.”

    दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधिश एन.व्ही. रमण यांनी किरण रिजीजू यांचे धडाकेबाज कायदा मंत्री असे वर्णन केले होते. ते म्हणाले होते की त्यांना पाहिल्यावर वाटले की ते ऑक्सफोर्डमधून शिकून आले असावेत. परंतु, नंतर मला समजले की त्यांचे शिक्षण सरकारी शाळेत झाले आहे. त्यांच्या गावात वीजही ते दहावीला असताना आली.



    यावर उत्तर देताना रिजीजू म्हणाले की अरुणाचल प्रदेशातील बहुतेक गावे पीएमजीएसवाय, सीआरएफ, बॉर्डर रोड योजना इत्यादी अंतर्गत जोडलेली आहेत. त्याचे संपूर्ण श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. देशातील दुर्गम भागातील विकासांसाठी मोदी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

    रिजीजू यांच्या वक्तव्यानंतर कॉँग्रेसच्या कार्यकाळात गावांना रस्ते आणि वीज पुरविल्याचा दावा कॉँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने केला. यावर रिजीजू यांनी म्हटले आहे की, ते या भागातील रस्ते पंतप्रधान अटलबिहारी  वाजपेयी यांच्या खासदार निधीतून अरुणाचल प्रदेशातील रस्ते बनवू शकले.

    Seeing Kiran Rijiju’s flamboyant performance, the Chief Justice said, “I thought he was educated in Oxford, then he understood that he was educated in a village school.”

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bihar : बिहारच्या बेतिया पोलिस लाईनमध्ये कॉन्स्टेबलने सहकारी सैनिकावर ११ गोळ्या झाडल्या

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून