वृत्तसंस्था
कोलकत्ता : विश्वभारती विद्यापीठ परिसराची सुरक्षा वाढविण्याची मागणी उपकुलपती विद्युत चक्रवर्ती यांनी केली आहे. Security of Visva-Bharati University Campus Vice Chancellor’s demand to increase
तृणमूल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अनुब्रत मोंडल आणि कार्यकर्ते यांनी निवडणुकीनंतर तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकी दिली आहे. त्यामुळे चक्रवर्ती यांनी विद्यापीठाचे कुलपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पर्याप्त सुरक्षा पुरविण्यांची मागणी एका पत्राद्वारे केली आहे.
पत्रात म्हंटले आहे की, तुम्हाला असा धडा शिकविला जाईल. त्याद्वारे जन्माची अद्दल घडविण्यात येईल. मला दिलेल्या धमकीच्या वृत्तपत्रातील कात्रणे ही प्रख्यात आनंदबझार आणि आजकालची सोबत जोडली आहेत. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परिसरात अनुचित प्रकार होऊ नये, त्यासाठी हा पत्रव्यवहार केल्याचे चक्रवर्ती यांनी पत्रात नमूद केले आहे.