विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – देशातील एकूण रुग्णसंख्येच्या जवळपास ५० टक्के रुग्ण हे केरळमधील आहेत. या राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येने लाखांचा आकडा पार केला आहे. तिसऱ्या लाटेला अटकाव घालण्याच्या दृष्टीने ही फारशी दिलासायदायक बाब नसल्याचे मानले जाते.Second wave of corona is still not gone
तज्ञांच्या म्हणण्यानुसार १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ४४ जिल्ह्यांत २ ऑगस्टला संपलेल्या आठवड्यात कोरोनाचा साप्ताहिक संसर्ग दर १० टक्क्यांच्या पुढे गेला होता, हेही आरोग्य यंत्रणेच्या काळजीचे कारण ठरत आहे. ८ राज्यांत १० हजार ते एक लाख इतके सक्रिय रुग्ण आढळत आहेत. या परिस्थितीचा स्पष्ट अर्थ हा की कोरोनाची दुसरी लाट अजून कायम आहे.
केरळ, महाराष्ट्रासह ६ राज्यांतील ज्या १८ जिल्ह्यांत रुग्णवाढ पुन्हा वेगाने होताना दिसत आहे. त्या ठिकाणी चाचण्या- रुग्णांचा माग काढणे, उपचार सुरू करणे व लसीकरण तसेच कंटेन्मेंट झोनमधील नियमांचे पालन प्रसंगी कडक लॉकडाउन आदी उपाय त्वरित अमलात आणण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे.
Second wave of corona is still not gone
महत्त्वाच्या बातम्या
- केवळ अमराठी तरुणांनाच नोकरीची जाहिरात देणाऱ्या गुजराती कंपनीविरोधात मनसेचे आंदोलन
- हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांना खलिस्तानवाद्यांकडून धमक्या, पण फुटीरवाद्यांशी सामना करण्यास आम्ही पूर्ण सज्ज असल्याचे खट्टर यांनी ठणकावले
- धमकाविण्याची फॅशन योग्य नाही, संसदेत निर्मला सीतारामन यांनी खासदारांना सुनावले
- करदात्यांना सीबीडीटीचा दिलासा, सहा प्रकारचे फॉर्म आणि स्टेटमेंट भरण्याची मुदत वाढविली
- लालूप्रसाद यादव यांचा चिराग पासवान यांना गळाला लावण्याचा प्रयत्न, तेजस्वी आणि त्यांनी एकत्र यावे अशी व्यक्त केली इच्छा