• Download App
    शेअर पम्प अँड डम्प प्रकरणात बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीसह 45 youtubers वर SEBI ची कारवाईSEBI action against 45 youtubers including Bollywood actor Arshad Warsi in share pump and dump case

    शेअर पम्प अँड डम्प प्रकरणात बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीसह 45 youtubers वर SEBI ची कारवाई

     वृत्तसंस्था

    मुंबई : सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने SEBI शेअर पम्प आणि डम्प प्रकरणात बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीवर कारवाई केली आहे. हर्षद वार्षिक सह 45 youtubers त्यात दोषी आढळले आहेत. या प्रकरणात अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरिटी हिचाही समावेश आहे.SEBI action against 45 youtubers including Bollywood actor Arshad Warsi in share pump and dump case.

    या सर्व सेलिब्रिटीजवर गुंतवणूकदारांची दिशाभूल करून शेअर बाजाराचे नुकसान केल्याचा आरोप आहे. SEBI ने गुरुवारी दोन मार्च 2023 ला शेअर बाजारात तत्काळ त्यांच्या व्यवहारांवर बंदी घातली आहे.

    साधना ब्रॉडकास्ट आणि शार्प लाईन बोर्ड कास्ट या दोन या नावाच्या दोन कंपन्यांनी शेअर मध्ये अफरातफर केली म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. या गुन्हेगारांनी साधना ब्रॉडकासचे शेअर्स कृत्रिम रित्या व्हॉल्युम क्रिएट करून ते विकले. तर या 45 youtubers नी 41.90 कोटी रुपयांचा अवैध नफा कमावला. द ॲडव्हाइस आणि मिनीमाईज नावाच्या यूट्यूब चॅनलने साधना ब्रॉडकास्ट शेअर्स बाबत गुंतवणूकदारांची दिशाभूल केली.

    SEBI अनेक दिवसांपासून youtubers वरती नियंत्रण ठेवण्याची तयारी करत होते. या संदर्भात दोन वर्षांपूर्वी नियम बनवण्याचे प्रयत्न सुरू होते. अर्शद वारसी सह 45 youtubers नी शेअर्स मध्ये व्हॉल्युम क्रिएट करून जवळजवळ महिन्याला 75 लाख रुपये कमावले. SEBI ने यासंदर्भात अभिनेत्याच्या पत्नीसोबत संभाषणही रेकॉर्ड केले आहे. SEBI ने आपल्या आदेशात म्हटले आहे, की साधना ब्रॉडकासाठी त्यांनी 27 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान तपासणी केली. तर शार्पलाईन बोर्डकास्ट ची 12 एप्रिल 2020 ते 19 एप्रिल 2022 दरम्यान तपासणी करण्यात आली.

    ही बातमी इन्स्टाग्रॅमवर फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्यावर मीम्स देखील क्रिएट झाली आहेत. Ban Bollywood ही ट्रेंड लोकांनी सुरू केली आहे. काही सेलिब्रिटीज स्वतः ती पुढे नेत आहेत.

    SEBI action against 45 youtubers including Bollywood actor Arshad Warsi in share pump and dump case

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते