प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्ली विद्यापीठाच्या तीन इमारतींचे भूमिपूजन केले. विद्यापीठात पोहोचण्यासाठी नरेंद्र मोदींनी दिल्ली मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांनी मेट्रोतील प्रवाशांसह दिलखुलास गप्पा मारल्या. विज्ञान, नवीन तंत्रज्ञान यांच्यापासून वेब सिरीज सिनेमा रिल्स अशा वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थी आणि मोदी यांच्यातल्या गप्पा रंगल्या.Science Technology to New Web Series; Modi’s chat with students in Delhi Metro!!
दिल्ली विद्यापीठातील कार्यक्रमात संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी मेट्रोमधील प्रवासाचा अनुभव शेअर केला. यावेळी त्यांनी प्रवाशांसह कोणत्या विषयांवर चर्चा केली याची माहिती दिली. ओटीटी, नव्या सीरिज यासंबंधी विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्याचं ते म्हणाले.
“येथील विद्यार्थ्यांप्रमाणे मीदेखील आज मेट्रोन प्रवास केला. विद्यार्थ्यांकडे बोलण्यासाठी फार विषय आहेत. विज्ञानापासून ते ओटीटीवरील नवीन सीरिजपर्यंत ते कोणत्याही विषयावर चर्चा करु शकतात,” अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं.
विद्यार्थी कोणत्याही विषयावर अथकपणे चर्चा करु शकतात. कोणता चित्रपट पाहिला, ओटीटीवर कोणती वेब सीरिज चांगली आहे, ती रिल पाहिली की नाही? चर्चा करण्यासाठी हा विषयांचा समुद्रच आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर हँडलवर आपल्या मेट्रो प्रवासाचे फोटो शेअर केले आहेत. सहप्रवासी म्हणून तरुण सोबत असल्याचा आनंद आहे असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.
दिल्ली विद्यापीठातील इमारती भूमिपूजन
या इमारती टेक्नॉलॉजी फॅकल्टी, कॉम्प्युटर सेंटर आणि शैक्षणिक ब्लॉकसाठी आहेत. या इमारती अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह 7 पेक्षा जास्त मजल्यांच्या असतील.
Science Technology to New Web Series; Modi’s chat with students in Delhi Metro!!
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार किंग मेकर नव्हे किंग ब्रेकर, ते सरकारे बनवण्यापेक्षा तोडण्यात माहीर; फडणवीसांचा प्रहार
- “ज्यांच्यामुळे इतकी वर्षे मुख्यमंत्री राहिलात, त्यांचा…” बिहारमध्ये अमित शाहांचा नितीश कुमारांवर निशाणा!
- पवारांनी मला नव्हे, पुतण्याला क्लीन बोल्ड केले, माझ्यामुळे ते अर्धसत्य तरी बोलले; फडणवीसांचा तिखट वार!!
- तामिळनाडू घटनात्मक संघर्ष; तुरुंगवासी मंत्री सेंथिल बालाजींना राज्यपालांनी हटविले; संतप्त मुख्यमंत्री जाणार कोर्टात!!