• Download App
    उत्तर प्रदेशासह 5 राज्यांत नियोजित वेळेतच निवडणूक; 80 वर्षे वयोगटावरील वृद्ध, कोरोनाबाधित व्यक्तींचे घरातूनच मतदान!! । Scheduled elections in 5 states including Uttar Pradesh; Voting from the home of 80 year old, coronated people !!

    उत्तर प्रदेशासह ५ राज्यांत नियोजित वेळेतच निवडणूक; ८० वर्षे वयोगटावरील वृद्ध, कोरोनाबाधित व्यक्तींचे घरातूनच मतदान!!

    • निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण घोषणा 

    वृत्तसंस्था

    लखनौ : उत्तर प्रदेशासह पाच राज्यांमध्ये नियोजित वेळेतच विधानसभा निवडणूक होईल. त्याच बरोबर मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे, याचाच एक भाग म्हणून 80 वर्षे वयोगटवरील वृद्ध आणि कोरोनाबाधित व्यक्ती हे घरात राहूनच मतदान करू शकतील. निवडणूक आयोग कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान घेऊ शकतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुशिल चंद्रा यांनी केली आहे. उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा निवडणुकीसंदर्भातला दौरा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. Scheduled elections in 5 states including Uttar Pradesh; Voting from the home of 80 year old, coronated people !!

    कोरोनाची तिसरी लाट आणि ओमायक्रोनची बाधा या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका नियोजित वेळेत होतील की नाही याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. परंतु पाचही राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळांनी आमची भेट घेतली आणि कोरोना प्रोटोकॉल पाळून नियोजित वेळेतच निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी केली या मागणीची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. कोरोना प्रोटोकॉलचे पालन करूनच निवडणूक पार पडेल. येत्या 5 जानेवारी रोजी या संदर्भात सविस्तर माहिती दिली जाईल, तसेच 5 जानेवारी रोजी या राज्यांमध्ये अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल, असे सुशिल चंद्रा म्हणाले.

    त्याच वेळी उत्तर प्रदेशातील निवडणुका नियोजित वेळेत होणार की नाही याचे शंका निरसनही त्यांनी केले. निवडणुका नियोजित वेळेतच होतील. सुमारे 1 लाख मतदान केंद्रे त्यासाठी उभारण्यात येतील. त्याचबरोबर मतदानाचे वेब कास्टिंग केले जाईल. मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशीन्स योजना करून मतदान प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक करण्याची निवडणूक आयोगाची योजना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मतदानाच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येतील. परंतु मतदान सकाळी 8.00 वाजल्यापासून सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत घेतले जाईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

    कोरोना बाधित व्यक्ती आणि 80 वर्षांच्या वयोगटातील व्यक्ती यांचे मतदान निवडणूक आयोगाचे अधिकारी – कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन घेतील, अशी महत्त्वपूर्ण आणि अभिनव घोषणा देखील निवडणूक आयोग मुख्य निवडणूक आयुक्त सुशिलचंद्रा यांनी केली आहे.

    Scheduled elections in 5 states including Uttar Pradesh; Voting from the home of 80 year old, coronated people !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले