• Download App
    पेगॅसेस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, मान्यवरांची सरन्यायाधीशांकडे मागणी |SC should intervene in pagases case

    पेगॅसेस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, मान्यवरांची सरन्यायाधीशांकडे मागणी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – पेगॅसेस या स्पायवेअरच्या माध्यमातून ठेवण्यात आलेल्या कथित पाळतप्रकरणाचे संसदेसह राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत असताना देशभरातील पाचशे मान्यवर आणि विविध संस्थांनी सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांना पत्र लिहिले आहे.SC should intervene in pagases case

    या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.मध्यंतरी माजी सरन्यायाधीश तरुण गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी महिला कर्मचारी देखील या स्पायवेअरच्या रडारवर होती, असा दावा करण्यात आला होता.



    या पत्रामध्ये त्याचादेखील संदर्भ देण्यात आला आहे. या पत्रावर सामाजिक कार्यकर्ते अरुणा रॉय, अंजली भारद्वाज, हर्ष मंदेर, विधिज्ञ आणि अभ्यासक वृंदा ग्रोव्हर, झुमा सेन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

    या स्पायवेअरची विक्री, तिचे हस्तांतरण आणि वापरावर निर्बंध घालण्यात यावेत, असेही त्यांनी म्हटले आहे. देशातील विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते, वकील आणि लैंगिक अत्याचारप्रकरणातील पीडितांवर पाळत ठेवण्यासाठी या स्पायवेअरचा वापर होत असेल तर ती धक्कादायक बाब असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

    SC should intervene in pagases case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी

    Disha Patani : दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणारे ठार; गाझियाबादेत एसटीएफने केले एन्काउंटर