• Download App
    कोरोना व्यवस्थापनावरून सर्वोच्च न्यायालयाने केले केंद्राचे कौतुक, म्हटले - "भारताने जे केले ते इतर देश करू शकले नाहीत!" । SC praises centres on covid 19 management justice shah says what india has done no other country could do

    कोरोना व्यवस्थापनावरून सर्वोच्च न्यायालयाने केले केंद्राचे कौतुक, म्हटले – “भारताने जे केले ते इतर देश करू शकले नाहीत!”

    SC praises centres on covid 19 management : कोरोना विषाणूच्या साथीला तोंड देण्यासाठी उचललेल्या पावलांसाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे कौतुक केले आहे. गुरुवारी न्यायमूर्ती एम. आर. शाह यांनी न्यायालयात म्हटले, “महामारीच्या व्यवस्थापनाबाबत भारताने जे केले, इतर देश ते करू शकले नाहीत.” यासह न्यायालयाने जीवितहानीच्या भरपाईसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांची नोंददेखील घेतली. SC praises centres on covid 19 management justice shah says what india has done no other country could do


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीला तोंड देण्यासाठी उचललेल्या पावलांसाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे कौतुक केले आहे. गुरुवारी न्यायमूर्ती एम. आर. शाह यांनी न्यायालयात म्हटले, “महामारीच्या व्यवस्थापनाबाबत भारताने जे केले, इतर देश ते करू शकले नाहीत.” यासह न्यायालयाने जीवितहानीच्या भरपाईसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांची नोंददेखील घेतली.

    केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की, कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना 50,000 रुपयांची भरपाई दिली जाईल. यावर आनंद व्यक्त करताना न्यायालयाने म्हटले की, ‘आज आम्ही खूप आनंदी आहोत. आम्ही आनंदी आहोत कारण हा निर्णय ज्यांनी महामारीच्या वेदना सहन केल्या आहेत, त्यांचे अश्रू पुसणार आहेत.”

    50 हजार रुपयांचा एक्स-ग्रेशिया

    केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना ₹50,000 एक्स-ग्रेशिया दिला जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) कोरोना संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंसाठी एक्स-ग्रेशिया रकमेबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. एनडीएमएने राज्य आपत्ती निवारण निधीतून राज्यांना ₹50हजार देण्याचे निर्धारित केले आहे. राज्ये या रकमेत वाढही करू शकतात.

    आता अक्षम व्यक्तींसाठी घरीच लसीकरणाची सुविधा

    हालचाल करण्यास अक्षम असलेल्या आणि विशेष गरजा असलेल्या व्यक्तींसाठी केंद्राने घरीच लसीकरण करण्यास मुभा दिली आहे. याविषयी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी माहिती दिली. ज्यांना घराबाहेर आणता येणे अवघड आहे किंवा एखाद्याला अपंगत्व असेल किंवा काही विशेष गरजा असल्यास तर त्यांच्यासाठी आम्ही घरीच लस देण्याची तरतूद केली आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

    SC praises centres on covid 19 management justice shah says what india has done no other country could do

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!