• Download App
    ‘साडी हा स्मार्ट ड्रेस नाही’ असे सांगून दिल्लीत महिलेला रेस्तराँमध्ये चक्क प्रवेश नाकारला। Saying that 'sari is not a smart dress', the woman in Delhi refused entry to the restaurant

    ‘साडी हा स्मार्ट ड्रेस नाही’ असे सांगून दिल्लीत महिलेला रेस्तराँमध्ये चक्क प्रवेश नाकारला

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ‘साडी हा स्मार्ट ड्रेस नाही’ असे सांगत एका महिलेला दिल्लीमधील एका नामांकित रेस्तराँमध्ये प्रवेश नाकारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यावरून सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. Saying that ‘sari is not a smart dress’, the woman in Delhi refused entry to the restaurant

    अनिता चौधरी या साडी नेसून दिल्लीमधील ऑगस्ट क्रांती मार्ग येथे असलेल्या अ‍ॅक्वीला या रेस्तराँमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी तेथील कर्मचारी यांनी त्यांना रोखले. हा व्हिडीओ व्हायरल होतोय.



    सोशल नेटवर्किंगवर १६ सेकंदांची एक क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये प्रवेश नाकारलेली महिला रेस्तराँच्या ड्रेसकोडसंदर्भातील नियमांबद्दल विचारत असताना दिसत आहे. “साडी नेसलेल्यांना प्रवेश नाही असं कुठे नमूद केलं ते दाखवा ,” असं ती महिला विचारते. यावर रेस्तराँची कर्मचारी, “मॅडम, आम्ही फक्त स्मार्ट कॅज्युअल कंपड्यांमध्ये असणाऱ्यांना प्रवेश देतो. साडी हा स्मार्ट कॅज्यूअल प्रकार नाही,” असे सांगून निघून जाते.

    अनिता चौधरी यांनी आधी हा व्हिडीओ शेअर केलाय. “अ‍ॅक्वीला रेस्तराँमध्ये साडी नेसलेल्यांना प्रवेश नाही कारण भारतीय साडी ही स्मार्ट कपड्यांमध्ये येत नाही. मात्र स्मार्ट कपडे म्हणजे काय याची काही ठोस व्याख्या असेल तर मला सांगा. मला स्मार्ट कपडे काय असतं ते सांगा म्हणजे मी साडी नेसणं बंद करेन,” अशा कॅप्शनसहीत त्यांनी व्हिडीओ शेअर केला.

    ड्रेस कोड पॉलिसीसंदर्भातील धोरणांवर टीका करताना अनेकांनी हे कसले फालतू नियम आहेत असे म्हणत घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली.

    Saying that ‘sari is not a smart dress’, the woman in Delhi refused entry to the restaurant

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य