रविकांत तुपकर यांच्या अटकेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना अधिक आक्रमक होण्याची Satyagraha of Ravikant Tupkar, leader of Swabhimani Shetkari Sanghatana; Police in riot gear stormed a rally on Friday, removing hundreds of protesters by truck
विशेष प्रतिनिधी
नागपूर : नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी पोलीस आयुक्तांनी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. दरम्यान सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी परवानगी नसताना शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संविधान चौकात बुधवारी सकाळी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे.
मात्र, त्यांना आंदोलन ठिकाणाहून पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले.तुपकर यांच्या अटकेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.तुपकर यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी काल सकाळपासून अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला होता.
मात्र, 144 कलम आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून पोलिसांनी त्यांना आंदोलनातून रात्रीच उचलले.दरम्यान, तुपकर यांनी पोलीस कस्टडीतही अन्नत्याग आंदोलन सुरुच ठेवले आहे. तसेच तुपकर यांना घेऊन पोलीस बुलडाणाच्या दिशेने रवाना झाले आहेत
.यावेळी तुपकर म्हणाले की , नागपूर शहरात संचारबंदीमुळे आमच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे.मग कर्फ्यू आदेश लागू असताना तुम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी दिली.असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे.
Satyagraha of Ravikant Tupkar, leader of Swabhimani Shetkari Sanghatana; Police in riot gear stormed a rally on Friday, removing hundreds of protesters by truck
महत्त्वाच्या बातम्या
- संभ्रमातील कॉँग्रेसमध्ये वीर दासच्या व्हिडीओवरून पडले दोन गट
- उत्तर प्रदेशात विकासाची मोदी एक्सप्रेस, कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची उद्घाटने
- २९ नोव्हेंबरपासून ते २३ डिसेंबरपर्यंत चालणार संसदेचे हिवाळी अधिवेशन
- ई-श्रम पोर्टलः ९२ टक्के कामगारांचा पगार १० हजार रुपयांपेक्षा कमी
- वीर दासवर कठोर कारवाई करा, विशिष्ठ जातीला लक्ष्य करणे सौम्य दहशतवाद, कंगना रनौटची मागणी