• Download App
    सरदार वल्लभभाई पटेल जयंती : भारतरत्न किताबाची वाचा "वेगळी" गोष्ट!! Sardar Vallabhbhai Patel Jayanti : Read Bharat Ratna book

    सरदार वल्लभभाई पटेल जयंती : भारतरत्न किताबाची वाचा “वेगळी” गोष्ट!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती. यानिमित्ताने देशभरात एकता दिवस साजरा केला जातो. राष्ट्रपती, पंतप्रधान अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते यांनी त्यांना आदरांजली अर्पित केली आहे. Sardar Vallabhbhai Patel Jayanti : Read Bharat Ratna book

    सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे लोहपुरुष होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 562 संस्थानांचे विलीनीकरण करण्याचा कणखर निर्णय सरदार वल्लभभाई पटेल यांनी घेतला. त्यांच्या निर्णयामुळे देशाचे आजचे भूराजकीय स्वरूप समोर दिसते आहे. भारतीय संघराज्याच्या निर्मितीत सरदार वल्लभभाई यांचा सिंहाचा वाटा आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचे मूल्यमापन सरकारने केले आहे. त्यांना भारतरत्न किताबाने गौरविले आहे, इतकेच नाहीतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वात उंच पुतळा केवडिया येथे उभारला आहे.

    पण सरदार वल्लभभाईंच्या भारतरत्न किताबाची गोष्ट “आगळीवेगळी” आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन 1950 मध्ये झाले. परंतु त्यांना भारतरत्न किताब 1991 मध्ये देण्यात आला.

    भारतरत्न किताबाची सुरुवात तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या पुढाकाराने 1954 मध्ये झाली. यातला पहिला भारतरत्न किताब डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देण्यात आला. त्यानंतर पुढच्याच वर्षी 1955 मध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न किताबाने गौरवण्यात आले. भारतरत्न किताबाची घोषणा राष्ट्रपती करत असले तरी त्याचे सर्व अधिकृत निर्णय अर्थातच केंद्र सरकार घेत असते वेगवेगळ्या केंद्र सरकारने त्या त्या वेळी निर्णय घेऊन भारतरत्न किताबाचे मानकरी निवडले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 9 महानीय व्यक्तींना भारतरत्न किताबाने गौरविण्यात आले आहे.



    त्याचबरोबर अनेक माजी पंतप्रधानांना देखील भारतरत्न किताबाने सन्मानित करण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यांच्या हयातीत 1955 मध्ये भारतरत्न किताब देण्यात आला. इंदिरा गांधी यांना देखील 1971 मध्ये भारतरत्न किताबाने गौरविण्यात आले. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना 1991 मध्येच म्हणजे त्यांच्या घातपाती निधनानंतर लगेच भारतरत्न किताबाने गौरवण्यात आले. त्याच वर्षी सरदार वल्लभभाईंचा देखील भारतरत्न किताबाने गौरव करण्यात आला. सरदार वल्लभभाईंना मात्र त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल 41 वर्षांनी भारतरत्न मिळाला. त्यावेळी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे सरकार अस्तित्वात आले होते.

    पण फक्त सरदार वल्लभभाई पटेल यांचाच गौरव दीर्घ काळानंतर भारतरत्नने करण्यात आला असे नव्हे, तर घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही 1990 मध्ये विश्वनाथ प्रताप सिंह सरकारच्या काळात भारतरत्न किताबाने गौरवण्यात आले होते. बाबासाहेबांचे निधन १९५६ मध्ये झाले. त्यापूर्वी दोनच वर्षे आधी म्हणजे १९५४ मध्ये भारतरत्न किताबाची सुरुवात झाली. परंतु, त्यावेळी बाबासाहेबांचे नाव कोणी भारतरत्न किताबासाठी सुचविले नव्हते. 1958 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न किताब देण्यात आला.

    भारतरत्न किताबाची कहाणी सामाजिक + राजकीय + सांस्कृतिक अशी आहे. राजकीय व्यक्तींना किताब देताना अनेकदा तत्कालीन राजकीय परिस्थितीचा विचार केला गेला आहे. 1986 मध्ये राजीव गांधी सरकारच्या काळात तामिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्र यांना मरणोत्तर भारतरत्न किताब जाहीर झाला होता. गुलझरीला नंदा हे दोनदा भारताचे हंगामी पंतप्रधान राहिले होते. ते अनेक वर्षे केंद्रात मंत्री होते. परंतु त्यांना देखील फार उशिरा म्हणजे 1990 च्या दशकात भारतरत्न किताब देण्यात आला.

    भारतरत्न किताब ची यादी बरीच मोठी आहे पण प्रत्येकाच्या कर्तृत्वाची नोंद त्याच्या हयातीतच घेतली, असे मात्र यातून दिसत नाही. सरदार पटेल देखील या यादीतले सर्वात मोठे नाव आहे.

    • Jawaharlal Nehru. Died 1964. Bharat Ratna 1955.
    • Indira Gandhi. Died 1984. Bharat Ratna 1971.
    • Rajiv Gandhi. Died 1991. Bharat Ratna 1991.
    • Sardar Patel. Died 1950. Bharat Ratna 1991.
    • Dr Ambedkar. Died 1956. Bharat Ratna 1990

    Sardar Vallabhbhai Patel Jayanti : Read Bharat Ratna book

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!