प्रतिनिधी
पणजी/ भंडारा : गोव्यात काँग्रेसने महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी आघाडी करण्याचे नाकारल्यानंतर संजय राऊत यांनी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला जोरदार चिमटे काढले आहेत.Sanjay Raut – Vadettiwar’s fight on the issue of single digit seats in Goa – counterattack
आम्ही खूप प्रयत्न केले. परंतु काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची दखल घेतली नाही. काँग्रेसच्या नेत्यांना गोव्यात 40 पैकी 45 जागा निवडून येतील, असा आत्मविश्वास वाटतो आहे. त्या आत्मविश्वासाला आम्ही का तडा द्यावा?, असा खोचक सवाल करून संजय राऊत यांनी काँग्रेसला टोला हाणला आहे. गोव्यात काँग्रेसच्या सिंगल डिजिट जागा निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला आहे.
संजय राऊत यांच्या खोचक वक्तव्यांना काँग्रेसचे महाराष्ट्रातले मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भंडार्यातून प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडी महाराष्ट्र सत्तेवर आहे. बाहेरच्या राज्यांमध्ये कोणत्या पक्षाशी युती करायची अथवा आघाडी करायची याचा निर्णय काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी घ्यायला मोकळे आहेत.
बाकी गोव्यामध्ये कोणामुळे कोणत्या पक्षाच्या सिंगल डिजिट जागा निवडून येतील हे लवकरच ठरेल. त्यासाठी संजय राऊत यांच्या सल्ल्याची काँग्रेसला गरज नाही, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
गोव्यात काँग्रेस मजबूत स्थितीत आहे. महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांचे गोव्यात राजकीय अस्तित्व देखील नाही, असा टोला त्यांनी संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला आहे.
Sanjay Raut – Vadettiwar’s fight on the issue of single digit seats in Goa – counterattack
महत्त्वाच्या बातम्या
- तृतीयपंथी सेलच्या अध्यक्षपदी अॅड. पवन यादव ,महिला काँग्रेसच्या अंतर्गत नियुक्ती
- आर्थिक संकटात असलेल्या श्रीलंकेला भारताकडून मदतीचा हात, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले अनेक करार
- कोरोनामुळे पश्चिम बंगालमध्ये चार नगरपालिकांच्या निवडणुका लांबल्या, आता राज्यात 31 जानेवारीपर्यंत निर्बंध
- उजनी धरणात होडीतून फिरण्यास गेलेल्या मुंबईच्या तरुणासह मछिमाराचा बुडून मृत्यू