प्रतिनिधी
मुंबई : 2019 च्या पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना पुरते एक्सपोज करून त्यांना कबूल करायला लावलेल्या अर्जासत्त्यावर संजय राऊत यांच्या वड्या सुरू झाल्या आहेत शरद पवारांनी गुगली टाकली आणि सिक्सर मारला, असा दावा संजय राऊत यांनी केला. Sanjay Raut jumps on Pawar’s admitted half-truth
देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक अशा दोन दिलेल्या मुलाखतींमधून 2019 चे शरद पवारांचे किस्से सांगत त्यांना एक्सपोज केले. शरद पवारांनी डबल गेम केली, असा आरोपही केला. शरद पवारांनी फडणवीसांच्या या आरोपावर प्रत्युत्तर देताना आपण गुगली टाकली आणि फडणवीस यांची विकेट गेली, असा दावा केला. त्यावर फडणवीसांनी आपण सांगितलेल्या सत्य घटनेमुळे पवारांना निदान अर्धसत्य तरी कबूल करावे लागले. त्यांना बोलावे लागले. पण त्यांनी स्वतःच्याच पुतण्याला क्लीन बोल्ड केले. मी देखील अजून पुढची गुगली टाकलेली नाही. पुढची गुगली टाकल्यावर पवारांना पूर्ण सत्य कबूल करावे लागेल, असा टोला हाणला.
देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात जी राजकीय जुगलबंदी सुरू आहे. त्यात संजय राऊत यांनी उडी घेतली आणि पवारांचाच दावा खरा मनात राजकीय फटकेबाजी केली. शरद पवारांनी त्यांची भाजपशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनीच आम्हाला सांगितले होते. इतकेच काय पण राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी काही राजकीय खेळी आवश्यक आहे असेही ते म्हणाले होते. त्यामुळेच त्यांनी पहाटेच्या शपथविधीचा डाव टाकला. फडणवीस त्याच मुद्द्यावरून गेले तीन वर्षे रडत आहेत. शरद पवारांनी तो डाव टाकला नसता तर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट उठवली नसती. महाविकास आघाडीचे बहुमत मान्य केले नसते. त्यामुळेच पवारांनी आधी गुगली टाकून नंतर सिक्सरही मारला, असा दावा संजय राऊत यांनी केला.
पण संजय राऊत यांचा हा दावा पवारांनी कबूल केलेल्या अर्धसत्यावर आधारित आहे. देवेंद्र फडणवीस अजून पुढचे वक्तव्य करायचे आहेत. त्यामुळे अजून सत्यावर पूर्णपणे प्रकाश पाडायचा आहे. पण त्यापूर्वी संजय राऊत यांनी शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे कबूल केलेल्या अर्धसत्यावरच उड्या मारत पवारांनी गुगली टाकली आणि सिक्सर मारल्याचा दावा केला.
Sanjay Raut jumps on Pawar’s admitted half-truth
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार किंग मेकर नव्हे किंग ब्रेकर, ते सरकारे बनवण्यापेक्षा तोडण्यात माहीर; फडणवीसांचा प्रहार
- “ज्यांच्यामुळे इतकी वर्षे मुख्यमंत्री राहिलात, त्यांचा…” बिहारमध्ये अमित शाहांचा नितीश कुमारांवर निशाणा!
- पवारांनी मला नव्हे, पुतण्याला क्लीन बोल्ड केले, माझ्यामुळे ते अर्धसत्य तरी बोलले; फडणवीसांचा तिखट वार!!
- तामिळनाडू घटनात्मक संघर्ष; तुरुंगवासी मंत्री सेंथिल बालाजींना राज्यपालांनी हटविले; संतप्त मुख्यमंत्री जाणार कोर्टात!!