प्रतिनिधी
अहमदाबाद : मुरबीतील पूल दुर्घटनेत मोठी मानवी हानी झाल्यानंतर प्रत्यक्ष घटनेनंतर ताबडतोब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी मदत कार्य सुरू केले असून ते अजूनही सुरू आहे. संघाचे जिल्हा संघचालक आणि सह विभाग कार्यवाह यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक बचाव कार्यामध्ये सहभागी झाले आहेत. Sangh’s sense of duty lends a helping hand to the bridge accident victims in Gujarat’s Morbi
- समाजाच्या सहकार्याने सर्व गटांतील रक्ताची व्यवस्था. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत सुमारे 200 स्वयंसेवक आवश्यक कार्यांमध्ये जोडले.
- प्रशासन व्यवस्थेचे त्वरित कार्य आणि आपसातील सहकार्यामुळे कामाला गती.
- टेलिफोन हेल्प लाईनसाठी सहाय्य. पोहणाऱ्यांकडून पुलापासून जखमी नागरिक आणि मृतदेहांना स्ट्रेचरमधून रुग्णवाहिकेपर्यंत घेऊन जाण्याची मदत.
- रुग्णवाहिका वेळेत हॉस्पिटलपर्यंत पोहोचावी यासाठी दोन कॉरिडोरची निर्मिती.
- हॉस्पिटलच्या आपत्कालीन कक्षापर्यंत पोहोचण्यात सहाय्य. मृतदेहांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी देखरेख.
- कुटुंबांचे सांत्वन आणि संवेदनेसोबतच मृतदेह ओळखण्यास मदत. तत्काळ माईक व्यवस्था, आवश्यक मार्गदर्शन.
तपशील
- प्रशासन, संघ स्वयंसेवक, सामाजिक संस्था-कार्यकर्ते, भारतीय सेना व NDRF च्या संयुक्त, त्वरित आणि संवेदनशील प्रयत्नांमुळे मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार एकूण 140 जणांचा मृत्यु झाला आहे. सुमारे 180 जखमी नागरिकांपैकी बहुतेकांना बरे वाटल्यावर हॉस्पिटलमधून डिस्जार्ज देण्यात आला आहे. दोन रुग्णांवर स्पाईन सर्जरी मोरबीपासून 50 किलोमीटरवर दूर असलेल्या राजकोट शहरात करण्यात आली आहे.
- मदत आणि बचाव कार्य यासाठी हॉस्पिटलमध्ये संघाचे सुमारे 130 कार्यकर्ते सामाजिक संस्था आणि प्रशासनासोबत सक्रिय होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रांत-प्रचारकांशी प्रत्यक्ष बोलून मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाचे संपूर्ण व्यवस्थापन संघाकडे सोपवले होते.
Sangh’s sense of duty lends a helping hand to the bridge accident victims in Gujarat’s Morbi
महत्वाच्या बातम्या
- सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त देशवासीयांना एकतेची शपथ!!
- पुण्यात मेट्रोच्या तिकिटासाठी आता रांगेत थांबण्याची नाही गरज; घ्या डिजिटल तिकीटे
- सरदार वल्लभभाई पटेल जयंती : भारतरत्न किताबाची वाचा “वेगळी” गोष्ट!!
- बेस्ट, सिटी बसप्रमाणे एसटीचे ही कळणार लाईव्ह लोकेशन; लवकरच अॅपमध्येही सुविधा
- महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर; 2000 कोटींची गुंतवणूक!!