विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कोरोना महामारीची रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत चालल्याने सुरू झालेल्या अनलॉकच्या प्रक्रियेत दिल्लीतील उद्याने, उघड्या जागेवर योगशिबिर, रेस्टॉरंट, दारूचे बार उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.Sanctions released in Capital Delhi
राजधानी दिल्ली आता वेगाने पूर्वपदावर येवू लागल्याचे हे चिन्ह आहे. अर्थात निर्बंध शिथील केल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारात गर्दी करत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढण्याची भिती वर्तविली जात आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून कोरोनाच्य नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहान केले आहे.मात्र, शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास, व्यायामशाळा व स्पा बंदच राहातील. सामाजिक-राजकीय-धार्मिक सभासमारंभ व मेळाव्यांवरील बंदीही कायम असून
त्याबाबत निर्णय २८ जून रोजी घेण्यात येईल असे दिल्ली सरकारने म्हटले आहे. २८ जूनला पहाटे ५ पर्यंत कोविड नियमांतील सूट कायम राहील व त्यावेळची महामारी परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल असेही राज्य सरकारने स्पष्ट केले.
Sanctions released in Capital Delhi
महत्त्वाच्या बातम्या
- गाईच्या तुपात कॅन्सरशी लढा देण्याची क्षमता
- ब्राझीलमध्ये कोरोना बळींची संख्या पाच लाखांच्या पुढे, सरकारविरोधात जनता रस्त्यावर
- परग्रहवासीयांनी चक्क अपहरण केल्याच्या ब्रिटनच्या अभिनेत्रीचा दाव्याने खळबळ
- चीनची लसीकरणातही आघाडी, एक अब्ज डोसचा टप्पा केला पार
- छत्तीसगडमध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा; नारायणपूर जिल्ह्यातील चकमकीत ठार