वृत्तसंस्था
नवी दिल्ली : गेले काही महिने कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने आता निवडणूक प्रचाराची धास्ती घेतली आहे. पंजाब येथे विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष येणार असून काहींनी अगोदरच प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे प्रचार हा शेतकरी आंदोलनाला मारक ठरेल, अशी धास्ती त्यांना वाटत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी प्रचारापासून दूर राहावे, असे आवाहन केले आहे.
Samyukta Kisan Morcha fears election campaign; Says propaganda kills the peasant movement
कृषी कायदा विरोधात आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने राजकीय पक्षांना पंजाबमध्ये निवडणूक प्रचारापासून दूर राहण्यास सांगितले आहे. हा प्रचार आंदोलन मोडीत काढण्याचा एक कट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याचे मोर्चाने शुक्रवारी निवेदन जारी केले. अशा स्थितीत निवडणूक प्रचार हे आंदोलनविरोधी सिद्ध होईल, अशी त्यांना भीती वाटू लागली आहे.
खरे तर निवडणुकीच्या काही महिने आधी प्रचार सुरू होतात, पण, काही पक्षांनी अगोदरच प्रचार सुरु केला आहे. हा प्रकार आंदोलन मोडीत काढण्यासाठी केला जात आहे. हा एक कट असल्याचा आरोप त्यांनी केला. जर पक्ष हे खरोखरच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे समर्थक असतील तर त्यांनी निवडणूक प्रचारापासून दूर राहिले पाहिजे, असे मोर्चाची निवेदनात नमूद केले आहे.
Samyukta Kisan Morcha fears election campaign; Says propaganda kills the peasant movement
महत्त्वाच्या बातम्या
- जेईई मेन परीक्षेत घोटाळा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सीबीआयचे दिल्ली,पुणे, बेंगळुरू, जमशेदपूर आणि इंदूरसह एकूण १९ ठिकाणी छापे
- सुब्रमण्यम यांचे पीएम मोदींना पत्र, हायप्रोफाईल भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमधील विलंबामुळे भाजपची प्रतिमा मलिन होत आहे
- कोरोना हाताळण्यात अपयश, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा देणार राजीनामा