वानखेडे यांची मेहुणी हर्षदा रेडकर ड्रग्स व्यवसायात समीर वानखेडे यांच्याशी नेमका काय संबंध याचं उत्तर त्यांनी द्यायलाच हवं,’ असं मलिक यांनी म्हटलं होतं.Sameer Wankhede gave ‘this’ reaction regarding sister-in-law Harshda Redkar drugs case
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी सोमवार (11 नोव्हेंबर) एक ट्विट करुन पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्या भूमिकेबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. ज्याला आता स्वत: समीर वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे.
‘समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा रेडकर ड्रग्स व्यवसायात गुंतलेली आहे का? पुण्यातील कोर्टात तिच्या नावावरील केस प्रलंबित आहेत. हा घ्या पुरावा,’ असं म्हणत, नवाब मलिक यांनी आज सकाळी एक ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटसोबत ई कोर्ट सर्व्हिसवरील काही फोटो शेअर केले होते. या प्रकरणाचा समीर वानखेडे यांच्याशी नेमका काय संबंध याचं उत्तर त्यांनी द्यायलाच हवं,’ असं मलिक यांनी म्हटलं होतं.दरम्यान, नवाब मलिक यांनी केलेल्या या ट्विटनंतर आता समीर वानखेडे यांनी देखील नवाब मलिकांना उत्तर दिलं आहे.
मलिकांनी केलेल्या ट्विटबद्दल जेव्हा वानखेडे यांना विचारण्यात आलं तेव्हा समीर वानखेडे म्हणाले की, ‘जेव्हा २००८ साली हे प्रकरण घडलं तेव्हा मी सेवेत देखील नव्हतो. मी २०१७ साली म्हणजेच म्हणजेच ड्रग्ज प्रकरणातील केसनंतर तब्बल नऊ वर्षांनी मी क्रांती रेडकरशी लग्न केलं आहे. यामुळे माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. ही घटना जुनी आहे मग तरीही माझा या खटल्याशी संबंध कसा?’ असा प्रति सवाल वानखेडे यांनी नवाब मलिक यांना केला आहे.
Sameer Wankhede gave ‘this’ reaction regarding sister-in-law Harshda Redkar drugs case
महत्त्वाच्या बातम्या
-
- ब्रिटनमध्ये प्रथमच महात्मा गांधीजींचे चित्र असलेले नाणे प्रसिद्ध
- प. बंगालमध्ये इंधनावरील व्हॅट कमी करण्याची भाजपची तृणमूल काँग्रेसकडे मागणी
- रशियाचे तब्बल ९० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर, तणाव वाढला
- अमिताभ बच्चन यांच्या घरातील पेंटिंगची चर्चा
- भारताची भूमी बळकाविण्यासाठी चीनच्या सातत्याने व्यूहात्मक खेळी – अमेरिकेचा अहवाल