• Download App
    विरोधी ऐक्याची कोलकत्यात चर्चा; कर्नाटकात काँग्रेसचा ऐक्याला सुरूंग!! Samajwadi Party chief Akhilesh Yadav called on TMC chairperson and West Bengal CM Mamata Banerjee

    विरोधी ऐक्याची कोलकत्यात चर्चा; कर्नाटकात काँग्रेसचा ऐक्याला सुरूंग!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : विरोधी ऐक्याची कोलकत्या चर्चा सुरू असताना कर्नाटकात मात्र काँग्रेसने त्या ऐक्यात प्रयत्नांना सुरुंग लावला आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख आज कोलकत्यामध्ये जाऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना भेटले. सर्व विरोधी पक्षांच्या ऐक्या संदर्भात या दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. Samajwadi Party chief Akhilesh Yadav called on TMC chairperson and West Bengal CM Mamata Banerjee

    अखिलेश यादव हे यानंतर भारत राष्ट्र समिती तसेच अन्य प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना देखील भेटणार आहेत. काँग्रेसने विरोधी ऐक्या संदर्भात जरूर विचार करावा, असे वक्तव्य यांनी केले आहे.

    मात्र एकीकडे कोलकत्यात अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांची विरोधी ऐक्याची चर्चा सुरू असताना कर्नाटकात मात्र काँग्रेसने त्या ऐक्य प्रयत्नांना सुरुंग लावला आहे. कर्नाटकात काँग्रेसने कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वबळावर विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

    वास्तविक कर्नाटक माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा धर्मनिरपेक्ष जनता दल अर्थात जेडीएस आणि प्रतिबंधित मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे अर्थात पीएफआयची राजकीय संघटना डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ इंडिया एसडीपीआय हे दोन राजकीय प्रादेशिक पक्ष आहेत. या दोन्ही पक्षांची काँग्रेस युती करण्याची शक्यता होती. परंतु काँग्रेसने तेथे स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेऊन एक प्रकारे विरोधी ऐक्याच्या प्रयत्नांनाच सुरंग लावला आहे. त्यामुळे देवेगौडांचा जेडीएस आता कदाचित देशातल्या सर्व प्रादेशिक पक्षांच्या एकजुटीचा एक घटक म्हणून काँग्रेसला वगळून पुढे येऊ शकतो.

    Samajwadi Party chief Akhilesh Yadav called on TMC chairperson and West Bengal CM Mamata Banerjee

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या, भारताची तीव्र प्रतिक्रिया

    France : भारताने घेतला मोठा निर्णय! फ्रान्सकडून खरेदी करणार जगातील सर्वात धोकादायक 40 लढाऊ जेट्स