• Download App
    कर्मचाऱ्यासांठी खूषखबर - आयटी क्षेत्रात यावर्षी सर्वाधिक वेतनवाढीची शक्यता । Salary hike will be given this year in Every sector

    कर्मचाऱ्यासांठी खूषखबर – आयटी क्षेत्रात यावर्षी सर्वाधिक वेतनवाढीची शक्यता

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या साथीमुळे दीड वर्षांपासून खालावलेली अर्थव्यवस्था आता सावरत असून २०२२ मध्ये वेतनवाढीत किमान ८.६ टक्के वाढ होण्याची आशा आहे. २०२१ या चालू वर्षात देशातील सुमारे ९२ टक्के कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना साधारणपणे आठ टक्के वेतनवाढ दिली आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी म्हणजे २०२०मध्ये केवळ ६० टक्के कंपन्यांनी ४.४ टक्के वाढ दिली होती. Salary hike will be given this year in Every sector

    पाहणीनुसार २०२२मध्ये माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात सर्वाधिक वेतनवाढीची शक्यता असून ‘आयटी’खालोखाल जीवन विज्ञान क्षेत्राचा क्रमांक असेल. रिटेल, आदरातिथ्य व रेस्टॉरंट, मूलभूत सेवा आणि रिअल इस्टेटमधील कंपन्यात कमी वेतनवाढीची शक्यता आहे.



    डेलॉइट कंपनीने केलेल्या प्राथमिक अनुमानानुसार २०२२ मध्ये वेतनवाढीत किमान ८.६ टक्के वाढ होण्याची आशा आहे. कंपनीने केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणात २०२० व २०२१ मधील वेतनवाढीची तुलना करीत कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. कोरोनामुळे गेली दीड वर्षे अर्थव्यवस्थेवर मरगळ होती. मात्र देशात निर्बंध शिथिल केल्याने व्यवसाय, बाजारपेठांमध्ये पुन्हा चैतन्य येण्यास सुरुवात झाली आहे. पाहणी केलेल्यांपैकी २५ टक्के कंपन्यांनी पुढील वर्षी दोन दोन आकडी (टक्क्यांत) वेतनवाढ देण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

    Salary hike will be given this year in Every sector

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!