• Download App
    नीरज चोप्राच्या सुवर्णपदकाला अशीही सलामी, नीरज नाव असल्यास पेट्रोल पंपावर मिळणार ५०१ रुपयांचे पेट्रोल मोफत|Salam to Neeraj Chopra's gold medal, If you have the name Neeraj, you will get free petrol of Rs 501 at the petrol pump

    नीरज चोप्राच्या सुवर्णपदकाला अशीही सलामी, नीरज नाव असल्यास पेट्रोल पंपावर मिळणार ५०१ रुपयांचे पेट्रोल मोफत

    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद : भारताचा २३ वर्षीय सुवर्णवीर नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पार पडलेल्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. गुजरातमधील एका पेट्रोल पंप मालकाने केवळ नीरज चोप्राला अनोखी सलामी दिली आहे. नीरज नावाच्या लोकांना भरूचमधील पेट्रोल पंप मालकाने ५०१ रुपयांचे मोफत पेट्रोल देण्याची घोषणा केली आहे.Salam to Neeraj Chopra’s gold medal, If you have the name Neeraj, you will get free petrol of Rs 501 at the petrol pump

    नीरज नाव असल्यास जुनागढमधील गिरनार रोपवेवर मोफत प्रवास मिळणार आहे. अंकलेश्वरच्या एका प्रसिद्ध सलून मालकाने नीरज नावाच्या लोकांचे मोफत कटिंग, शेव्हिंग करण्याची घोषणा केली आहे. ऑलिम्पिक सामन्यांमध्ये दीर्घ प्रतीक्षेनंतर, जेव्हा भालाफेकात नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळवले, तेव्हा देशातील प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने उंचावलीआहे.



    ९ ते २०ऑगस्ट दरम्यान, नीरज नावाची कोणतीही व्यक्ती आपले ओळखपत्र घेऊन गिरनार रोपवेवर जाऊ शकते, असे जुनागढमधील उषा बेक्रो कंपनीच्या संचालकाने सांगितले. या रोपवे वरून प्रवास करताना त्या व्यक्तीकडून कोणतेही शुल्क न घेता हा प्रवास करता येणार आहे.

    गिरनार रोपवे हा देशातील सर्वात लांब रोपवे आहे. याचे एका बाजूचे तिकीट चारशे रुपये आहे, तर दोन्ही कडील तिकीट सातशे रुपये आहे. पूर्वी गिरनार पर्वतावर जाण्यासाठी नऊ हजार ९९९ पायऱ्या चढाव्या लागतात. त्यामुळे आता अंबा माता जी मंदिर जुनागढ भवनाथाच्या पायथ्यापासून रोप वेने काही मिनिटात पोहोचता येणार आहे.

    Salam to Neeraj Chopra’s gold medal, If you have the name Neeraj, you will get free petrol of Rs 501 at the petrol pump

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक