• Download App
    राम जन्मभूमी आंदोलनातले फायर ब्रँड वक्ते, नेते संत आचार्य धर्मेंद्रजी कालवश!; आंदोलनातला महत्त्वाचा अध्याय समाप्त! Saint Acharya Dharmendraji Kalvash, the fire brand speaker of the Ram Janmabhoomi movement

    राम जन्मभूमी आंदोलनातले फायर ब्रँड वक्ते, नेते संत आचार्य धर्मेंद्रजी कालवश!; आंदोलनातला महत्त्वाचा अध्याय समाप्त!

    विशेष प्रतिनिधी

    राम जन्मभूमी आंदोलनातले फायर ब्रँड वक्ते नेते आणि संत आचार्य धर्मेंद्रजी यांचे निधन झाले आहे. जयपूर मधील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतला. आचार्य धर्मेंद्र हे हिंदुत्व, हिंदुस्थान आणि धर्म यासाठी जगले. संपूर्ण आयुष्य त्यासाठी त्यांनी वाहून घेतले होते. गोरक्षेपासून रामजन्मभूमी आंदोलनापर्यंत सर्व आंदोलनांमध्ये ते अग्रणी राहिले. Saint Acharya Dharmendraji Kalvash, the fire brand speaker of the Ram Janmabhoomi movement

    फायर ब्रँड वक्ते

    राम जन्मभूमी मंदिर आंदोलनात तर ते फायर ब्रँड वक्ते आणि नेते म्हणून संपूर्ण देशभर वावरले. भाजपचे माजी अध्यक्ष आणि उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी जी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढून संपूर्ण भारतात राम जन्मभूमी आंदोलनाविषयी जनजागृती केली होती, त्या आंदोलनाची पार्श्वभूमी आचार्य धर्मेंद्रजी, साध्वी ऋतंभरा आदी संतांच्या फायर ब्रँड वक्तव्यातून तयार झाली. भारतभरातील लाखो लोक या आंदोलनाशी जोडले गेले. लाखोंच्या जनसमुदायाला संपूर्णपणे भारवून टाकण्याची क्षमता आचार्य धर्मेंद्र यांच्या फायर ब्रँड वक्तृत्वात होती. ते नेहमी स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कट्टर अनुयायी मानायचे. आपल्या भाषणात ते नेहमी सावरकरांच्या देशभक्तीपर कवितांचे उल्लेख करायचे. इतकेच नव्हे, तर “हम बुलबुले है इसकी ये गुलिस्ता हमारा” अशा काव्यपंक्तींवर देखील संताप व्यक्त करायचे. हिंदुस्थानचा पुत्र बुलबुल नाही, तर सिंह आहे!! छत्रपती शिवाजी महाराज राणा प्रताप स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारस आहे, असा संदर्भ ते आपल्या भाषणातून वारंवार द्यायचे.

    आरोपी नंबर 1 व्हायला तयार

    6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद उध्वस्त केली, तेव्हा ते अयोध्येत उपस्थित होते. त्यांच्या भाषणांनी कारसेवकांची मने रामभक्तीने आणि देशभक्तीने उजळून निघाली होती. त्याचवेळी बाबरी मशीद उध्वस्त झाल्यानंतर जो तत्कालीन सरकारने जो राजकीय स्वरूपाचा खटला सर्व नेत्यांवर, आंदोलनकर्त्यांवर भरला होता. त्यातली प्रमुख जबाबदारी आपण घ्यायला तयार आहोत, असे त्यांनी जाहीररित्या सांगितले होते. किंबहुना आपण यातला आरोपी नंबर 1 व्हायला तयार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले होते. ते या खटल्याला सामोरे देखील गेले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींची श्रद्धांजली

    राम जन्मभूमी विरुद्ध बाबरी मशीद या खटल्याचा निकाल रामजन्मभूमीच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आचार्य धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    Saint Acharya Dharmendraji Kalvash, the fire brand speaker of the Ram Janmabhoomi movement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के