प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजस्थानमधील नाराज काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी भाजप प्रवेशाच्या बातम्या फेटाळल्या असल्या तरी त्यांची काँग्रेसमधली नाराजी लपून राहिलेली नाही. त्यांच्या पहिल्या बंडाच्या वेळी काँग्रेस नेतृत्वाने दिलेली आश्वासने आजही पाळली गेलेली नाहीत.sachin pilot in new delhi; expecting meeting with priyanka gandhi
या राजकीय पार्श्वभूमीवर नाराज सचिन पायलट राजधानी दिल्लीत दाखल झाले असून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी थेट प्रियांका गांधी लक्ष घालणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याची खात्री काँग्रेस पक्षातून देण्यास कोणी तयार नाही.
काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील तरूण नेते जितीन प्रसाद यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर सचिन पायलट यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती.
पूर्वीच्या काँग्रेस नेत्या आणि सध्याच्या भाजपाच्या उत्तर प्रदेशातील नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांनी सचिन पायलट लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. पण तो स्वतः सचिन पायलट यांनीच फेटाळून लावला होता.
त्यानंतर पायलट हे अचानक दिल्लीत दाखल झाले. शुक्रवारी रात्री पायलट दिल्लीत पोहोचले. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पायलट यांच्या संपर्कात असून, काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी या राजस्थानातील राजकीय तिढा सोडवण्यासाठी मध्यस्थी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
त्यामुळे सचिन पायलट आणि त्यांच्या गटाची नाराजी दूर करण्यात प्रियांका गांधी आणि काँग्रेस नेत्यांच्या प्रयत्नांना किती दिवसात यश येणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
sachin pilot in new delhi; expecting meeting with priyanka gandhi
महत्त्वाच्या बातम्या
- मच्छीमारांच्या वारसांना तब्बल चार कोटींची भरपाई, इटलीच्या नौसैनिकांवरील खटला अखेर बंद
- अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स जगाला तब्बल एक अब्ज डोस पुरविणार
- स्वेच्छानिवृत्ती घ्यायचीय?, मग त्याआधी हा सारासार विचार करा
- कूस्तीपटू सुशील कुमारची तुरूंगात प्रथिनयुक्त आहाराची मागणी
- कार्बनचे हवेतील प्रमाण धोकादायक पातळीवर, वाढीने उच्चांक गाठल्याने शास्त्रज्ञ हादरले
- पाणी उतू जात नाही मग दूधच का उतू जाते?