वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा भारतावर रशियाकडून आयात थांबविण्यासाठी दबाव आहे. भारताने रशिया कडून तेल किंवा अन्य माल खरेदी करू नये यासाठी दबाव वाढवला जात आहे. पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी थेट अमेरिकेत जाऊनच अमेरिका आणि युरोपची पोलखोल केली आहे. भारत संपूर्ण महिनाभरात रशियाकडून जेवढे तेल खरेदी करत नाही, तेवढे तेल संपूर्ण युरोप रशियाकडून एका दुपारपर्यंत खरेदी करतो, अशा शब्दांत जयशंकर यांनी अमेरिकन पत्रकारांसमोर युरोप आणि अमेरिकेची पोलखोल केली आहे.
Russia – US Europe: Europe buys as much oil as it does from Russia in a month, by noon; Jaishankar did “Polkhol” !!
भारताला रशियाकडून तेल खरेदी संदर्भात प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही युरोप काय करतो यावर लक्ष केंद्रित करा, असा टोला जयशंकर यांनी अमेरिकेत बायडेन प्रशासनाला आणि अमेरिकन मीडियाला हाणला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे दोघेही वरिष्ठ मंत्री भारत अमेरिका द्विमंत्री चर्चेसाठी सध्या अमेरिकेत आहेत. या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना जयशंकर यांनी अमेरिकेची पुरती पोलखोल केली.
रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि युरोपीय देशांनी जरी रशियावर निर्बंध घातले असले तरी प्रत्यक्षात रशियाकडून तेल खरेदी करण्याची युरोप मागे नाही. रशियाकडून तेल खरेदी करणे युरोपने थांबवलेले नाही, हा मुद्दा जयशंकर यांनी प्रकर्षाने अमेरिकन मीडियाच्या लक्षात आणून दिला. याबाबतच बोलताना त्यांनी भारत रशियाकडून महिनाभरात जेवढे तेल खरेदी करत नाही तेवढे तेल संपूर्ण युरोप एका दुपारपर्यंत रशियाकडून खरेदी करतो, अशा शब्दांत त्यांनी अमेरिका आणि युरोपीय धोरणाचे वाभाडे काढले आहेत.
Russia – US Europe: Europe buys as much oil as it does from Russia in a month, by noon; Jaishankar did “Polkhol” !!
महत्त्वाच्या बातम्या
- संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे पुढचे पाऊल, रणगाडाविरोधी हेलिना क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
- मुख्यमंत्र्यांचे असेही धाडस, कॅसिनो चालविण्याचा आरोप झालेल्या मंत्र्याला काढण्यासाठी संपूर्ण मंत्रीमंडळच केले बरखास्त, अकार्यक्षमांनाही वगळले
- वीज विकतही मिळेना, थोडी झळ सहन करा, गुजरातचे उदाहरण देत नितीन राऊत यांचे वीज प्रश्नावरही राजकारण
- तामीळ वाघांना पुन्हा जीवंत करण्याचा प्रयत्न, ईडीने कारवाई करून भारतीयांची ३ कोटी ५९ लाखांची संपत्ती केली जप्त