RSS entry on micro-blogging site Koo : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सोशल मीडिया दिग्गज ट्विटरबरोबरच आता स्वदेशी प्लॅटफॉर्म Koo वर एंट्री केली आहे. आपल्या मनमानीमुळे आधीच ट्विटर विरुद्ध सरकारमध्ये संघर्ष उडालेला आहे. मध्यंतरी काही प्रकरणांमुळे ट्विटरला भारतीयांच्या रोषालाही सामोरे जावे लागले होते. RSS entry on micro-blogging site Koo, competition with Twitter
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सोशल मीडिया दिग्गज ट्विटरबरोबरच आता स्वदेशी प्लॅटफॉर्म Koo वर एंट्री केली आहे. आपल्या मनमानीमुळे आधीच ट्विटर विरुद्ध सरकारमध्ये संघर्ष उडालेला आहे. मध्यंतरी काही प्रकरणांमुळे ट्विटरला भारतीयांच्या रोषालाही सामोरे जावे लागले होते.
आता जगातील सर्वात मोठी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) मेड इन इंडिया मायक्रो-ब्लॉगिंग साइट Kooमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आरएसएस आता आपले सर्व मोठे निर्णय आणि माहिती Kooच्या माध्यमातून शेअर करणार आहे. @RSSOrg हे संघाचे अधिकृत अकाउंट आहे. आरएसएसची कूमध्ये एंट्री ही ट्विटरला मोठा झटका आहे, कारण आरएसएस ही जगातील सर्वात मोठी सांस्कृतिक संघटना असून याचे भारतातच नव्हे, तर जगभरात कोट्यवधी समर्थक आहेत.
केंद्र सरकार Vs ट्विटर संघर्ष
गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकार आणि ट्विटरदरम्यान ब्लू टिकसहित अनेक नव्या नियमांवरून तणाव सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासह अनेक नेत्यांचे खासगी ट्विटर हँडलवरून ब्लू टिक हटवली होती. तथापि, या निर्णयावर वाद वाढल्यावर ट्विटरने उपराष्ट्रपतींच्या ट्विटर हँडलवर पुन्हा ब्लू टिक स्थापित केली.
ज्या वेगानं कू लोकप्रिय होत आहे ते पाहता येत्या काही दिवसांत आणखी बडे नेते कूमध्ये दिसतील. बुधवारी सायंकाळी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील फेरबदलाचा परिणाम कूवर स्पष्टपणे दिसून आला. मंत्रिपदावर निवडून आलेले आणि आपल्या पदाचा राजीनामा देणारे सर्व मंत्री ट्विटरच्या आधी कूवर एकमेकांचे अभिनंदन करत होते.
RSS entry on micro-blogging site Koo, competition with Twitter
महत्त्वाच्या बातम्या
- Oxfam Report : ऑक्सफॅमचा धक्कादायक अहवाल, जगात दर मिनिटाला 11 जणांचा उपासमारीमुळे मृत्यू
- देवेंद्र फडणवीसांच्या एका पत्रामुळे राष्ट्रवादीच्या नेत्याची गच्छंती; जाणून घ्या कोण आहेत राजकुमार ढाकणे?
- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर, तीन महिने घेणार विश्रांती
- कोरोनावर ग्लेनमार्कचा येणार नेझल स्प्रे, लवकरच तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्सना सुरुवात
- आनंदाची बातमी : पवित्र पोर्टलमधून लवकरच 6100 शिक्षणसेवकांची भरती, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती