• Download App
    रा. स्व. संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक भाग्यनगर - हैद्राबाद येथे सुरू; भारतकेंद्रित शिक्षणाविषयी चिंतन|RSS coordination meeting in bhagyanagar - Hyderabad

    रा. स्व. संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक भाग्यनगर – हैद्राबाद येथे सुरू; भारतकेंद्रित शिक्षणाविषयी चिंतन

    प्रतिनिधी

    हैद्राबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रेरीत समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या संघटनांच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची अखिल भारतीय समन्वय बैठक आज दि. ५ जानेवारी, २०२२ पासून भाग्यनगर (हैदराबाद), तेलंगणा येथे सुरु झाली.RSS coordination meeting in bhagyanagar – Hyderabad

    रा.स्व. संघाच्या वतीने दरवर्षी अशा व्यापक समन्वय बैठकीचे आयोजन केले जाते. या बैठकीमध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, पाच सहसरकार्यवाह आणि अन्य पदाधिकारी उपस्थित आहेत.



    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी यावेळी सांगितले की, संघसंबंधित ३६ संस्थांमधून २१६ पदाधिकारी या बैठकीमध्ये सहभागी झाले आहेत. सर्व उपस्थितांनी कोविड नियमांनुसार लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. या बैठकीमध्ये कोणतेही निर्णय घेतले जाणार नसून, केवळ माहिती प्रसारासाठी ही बैठक आहे.

    मागील वर्षी गुजरातमध्ये कर्णावती येथे झालेल्या बैठकीत अर्थव्यवस्थेशी संबंधित भारतीय मजदूर संघ, स्वदेशी जागरण मंच, लघु उद्योग भारती, इ. संस्थांनी देशांतर्गत रोजगारवाढीविषयी विचारमंथन केले. त्यांनी सरकारी धोरणे आणि तळागाळातील परिस्थिती याविषयी चिंतन केले.

    यावर्षी विद्या समूहातील विद्या भारती, अभाविप, भारतीय शिक्षण मंडळ आदि संस्था भारतकेंद्रित शिक्षणाविषयी चिंतन करतील. याविषयी असलेले त्यांचे अनुभव, तसेच सेवा भारतीचे कोविडमधील उपक्रम आणि आरोग्यवृद्धी तसेच मुलांमधील कुपोषण निवारणासाठीचे विविध उपक्रम, यांची माहिती यावेळी दिली जाणार आहे असेही आंबेकर यांनी सांगितले.

    ते पुढे म्हणाले की, येत्या काही वर्षात संघाला १०० वर्षे पूर्ण होतील. पर्यावरण, कुटुंब प्रबोधन आणि सामाजिक समरसतेविषयीच्या उपक्रमांविषयी चर्चा केली जाईल. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये सर्व संघटना सहभागी झाल्या आहेत. त्यांनी आयोजित केलेले कार्यक्रम आणि विशेष उपक्रमांविषयी चर्चा होणार आहे.सुनील आंबेकर यांनी नमूद केले की, दि. ७ जानेवारी २०२२ रोजी, दुपारी साडेबारा वाजता सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य पत्रकार परिषदेस संबोधित करणार आहेत.

    RSS coordination meeting in bhagyanagar – Hyderabad

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले