विशेष प्रतिनिधी
ढाका – रोहिंग्या स्थलांतरीतांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करणाऱ्या मोहिबउल्ला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. काही अज्ञात हल्लेखोरांनी कॉक्सबझार जिल्ह्यात असलेल्या मदत छावणीत मोहिबउल्ला यांच्यावर गोळ्या झाडल्या. Rohingya leader shot dead in Bangaladesh
मोहिबउल्ला हे व्यवसायाने शिक्षक होते. म्यानमारमध्ये होणाऱ्या अत्याचारांना कंटाळून मोहिबउल्ला यांच्यासह सुमारे सात लाख रोहिंग्या मुस्लिम स्थलांतरीत झाले आहेत. बांगलादेशमध्येच बहुतांशी रोहिंग्या आश्रयाला आले आहेत. त्यांच्या प्रश्नां ना मोहिबउल्ला यांनी अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर वाचा फोडली आहे.
म्यानमारच्या लष्कराने रोहिंग्यांवर केलेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ त्यांनी ढाक्यात दोन लाख रोहिंग्यांचा मोर्चा काढला होता. या मोर्चावरून मोहिबउल्ला यांच्यावर टीकाही होत होती. त्यांच्यावरील हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने अथवा गटाने स्वीकारलेली नाही. या घटनेवर मानवाधिकार संघटनांनी टीका केली आहे.
Rohingya leader shot dead in Bangaladesh
महत्त्वाच्या बातम्या
- सशक्त, आत्मनिर्भर भारतासाठी शपथ घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन
- लालूप्रसादांच्या घरात उफाळून आली भाऊबंदकी, तेजस्वीने लालूंना दिल्लीत कोंडून ठेवल्याचा धाकटा भाऊ तेजप्रतापचा आरोप
- रामदास कदम खोटारडे, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवींची टीका
- जलयुक्त शिवारमुळे नव्हे, तर नद्यांमधील अवैध वाळू उपशामुळे पूर; फडणवीसांचा ठाकरे – पवार सरकारला टोला