Priyanka Gandhi : कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज आपला आसाम दौरा रद्द केला आहे. कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे प्रियांका यांनी हा दौरा रद्द केला. स्वत: प्रियांका गांधी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. प्रियांका म्हणाल्या की, त्या स्वत: विलगीकरणात राहत आहेत. Robert Vadra corona Positive, Priyanka Gandhi negative, all election tours canceled due to Quarantine
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज आपला आसाम दौरा रद्द केला आहे. कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे प्रियंका यांनी हा दौरा रद्द केला. स्वत: प्रियंका गांधी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. प्रियंका म्हणाल्या की, त्या स्वत: विलगीकरणात राहत आहेत. कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्या होत्या. यानंतर त्यांनी तातडीने कोरोना टेस्ट केली. यामध्ये त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. परंतु डॉक्टरांनी त्यांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिलाय. प्रियांका म्हणाल्या की, या गैरसोयीबद्दल मी दिलगीर आहे, मी कॉंग्रेसच्या विजयाची कामना करते.
रॉबर्ट वाड्रा यांना कोरोनाचा संसर्ग
दरम्यान, प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा कोरोना संक्रमित आहेत. रॉबर्ट वाड्रा यांचा अहवाल सकारात्मक आलेला आहे. वाड्रा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती शेअर केली. मागच्या काही दिवसांपासून प्रियांका गांधी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. प्रियांका गांधींनी आसाम आणि बंगालमध्ये नुकतेच अनेक निवडणूक सभांना संबोधित केले.
सप्टेंबरमध्येही विलगीकरणात होत्या प्रियांका गांधी
गतवर्षी सप्टेंबरमध्येही प्रियांका गांधी या विलगीकरणात राहिल्या होत्या. त्यांच्या स्वयंपाक्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले होते. तेव्हा प्रियांका गांधी यांना 14 दिवस घरात एकांतात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.
Robert Vadra corona Positive, Priyanka Gandhi negative, all election tours canceled due to Quarantine
महत्त्वाच्या बातम्या
- चॉकलेट घ्या अन् मत द्या! पाकमध्ये निवडणूक प्रचाराची अनोखी शक्कल, नेटकरी म्हणाले, स्मार्ट उमेदवार!
- पेट्रोल- डिझेलवर लवकरच मिळेल दिलासा, ओपेक देशांची तेल उत्पादन वाढविण्याला सहमती
- दाऊदच्या डोंगरीतील ड्रग्ज फॅक्टरीचा मॅनेजक दानिश चिकणाला राजस्थानाच्या कोटामधून अटक; एनसीबीची आत्तापर्यंतची मोठी सफलता
- आसाममध्ये भाजप आमदाराच्या कारमध्ये कसे आले EVM?, आयोगाचा वस्तुनिष्ठ अहवाल; चार अधिकारी निलंबित, एका बूथवर पुन्हा मतदान
- मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते : महाराष्ट्रात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाशिक महानगरपालिके समोरच ‘ त्या ‘ कोव्हीड रूग्णाचा करूण अंत