• Download App
    राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वी रॉबर्ट वाड्रा शिर्डीत साईबाबांच्या चरणी Robert Vadra at Saibaba's feet in Shirdi before Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra enters Maharashtra

    राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वी रॉबर्ट वाड्रा शिर्डीत साईबाबांच्या चरणी

    प्रतिनिधी

    शिर्डी : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा तेलंगणातून महाराष्ट्र दाखल होण्यापूर्वीच त्यांचे मेहुणे आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे शिर्डीत येऊन साईबाबांच्या चरणी दाखल झाले. रॉबर्ट वाड्रा यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. शिर्डीत अन्नदान केले आणि त्यांनी पत्रकार परिषदेत घेतली. Robert Vadra at Saibaba’s feet in Shirdi before Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra enters Maharashtra

    या पत्रकार परिषदेत बोलताना रॉबर्ट वाड्रा यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सूडभावनेतून विरोधी पक्षांवर कायदेशीर कारवाया करत असल्याची टीका केली. राहुल गांधी यांचे विचार साईबाबा यांच्यासारखेच आहेत. साईबाबा यांनी सर्वधर्मीयांना बरोबर घेऊन त्यांना भक्ती शिकवली. तसेच राहुल गांधी देखील सर्वधर्मीयांना बरोबर घेऊन भारत जोडो यात्रा करत आहेत, असे रॉबर्ट वाड्रा म्हणाले



    राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणामध्ये आहे. येत्या दोन-तीन दिवसात त्यांची भारत जोडो यात्रा प्रथम नांदेडमध्ये येईल. यावेळी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. त्याचबरोबर राहुल गांधी यांच्याबरोबर भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील सहभागी होण्याचे नियोजन काँग्रेसने केले आहे.

    या राजकीय पार्श्वभूमीवर रॉबर्ट वाढला यांनी शिर्डीमध्ये येऊन साईबाबांचे दर्शन घेतले आहे. तिथे दर्शनाबरोबरच अन्नदान करून त्यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधींची भारत जोडो यात्रेविषयीचे विवेचनही केले आहे.

    Robert Vadra at Saibaba’s feet in Shirdi before Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra enters Maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!