Saturday, 10 May 2025
  • Download App
    उत्तर प्रदेशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या अवघी पाचशेच्या आत; रविवारचे सारे निर्बंध शिथिल। Ristrictions in UP takes back from sunday

    उत्तर प्रदेशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या अवघी पाचशेच्या आत; रविवारचे सारे निर्बंध शिथिल

    वृत्तसंस्था

    लखनौ : उत्तर प्रदेशातील कोविडची स्थिती नियंत्रणात आल्याने योगी आदित्यनाथ सरकारने राज्यातील रविवारचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व बाजार येत्या रविवारपासून सुरू होणार आहेत. रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. Ristrictions in UP takes back from sunday

    राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे दुसऱ्या लाटेवर नियंत्रण येत असून जनजीवन सामान्य होत आहे. राज्यात अलीगड, अमेठी, बदायूं, देवरिया, फर्रुखाबाद, हमीरपूर, हरदोई, हाथरस, कासगंज, महोबा, मिर्झापूर, संत कबीरनगर, श्रावस्ती, श्यानमली या ठिकाणी कोविडचा एकही रुग्ण नाही. हे ठिकाणं कोविड संसर्गमुक्त आहेत. राज्यात सध्या दररोज सरासरी अडीच लाख चाचण्या होत आहेत. तर पॉझिटिव्हिटी रेट ०.०१ टक्के आहे आणि रिकव्हरी रेट ९८.६ टक्के आहे.



    राज्यात गेल्या चोवीस तासात २ लाख ३३ हजार ३५० चाचण्या घेण्यात आल्या आणि ५८ जिल्ह्यात एकही बाधित आढळून आला नाही. त्याचवेळी १७ जिल्ह्यात एक अंकी रूग्ण सापडला. सध्या राज्यात ४०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या खबरदारी घेण्याची गरज असून थोडाही निष्काळजीपणा संसर्ग वाढीस कारणीभूत ठरू शकतो, असे प्रशासनाने म्हटले आहे.

    Ristrictions in UP takes back from sunday

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??

    Indian Army पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतरच भारताने सध्या थांबविले फायरिंग; भारतीय सैन्य दलांचा स्पष्ट खुलासा; शस्त्रसंधी शब्द नाही वापरला!!