• Download App
    ऋषी सुनक ब्रिटनमध्ये पंतप्रधान बनू शकतात, तर भारतातही मुस्लिम पंतप्रधान बनेल; फारूख अब्दुल्लांचा तर्क Rishi Sunak can become Prime Minister in UK, Muslim will become Prime Minister in India too

    ऋषी सुनक ब्रिटनमध्ये पंतप्रधान बनू शकतात, तर भारतातही मुस्लिम पंतप्रधान बनेल; फारूख अब्दुल्लांचा तर्क

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : ब्रिटनमध्ये जर ऋषी सुनक पंतप्रधान बनू शकतात, तर भारतातही लवकरच मुस्लिम नेता पंतप्रधान बनू शकतो, असे राजकीय भाकीत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी केले आहे. ऋषी सुनक हे हिंदू आहेत. ब्रिटनच्या ख्रिश्चन समाजाच्या दृष्टीने अल्पसंख्याक आहेत. तरीही ते तिथे पंतप्रधान बनू शकतात, तर भारतात देखील अल्पसंख्याक समाजाचा म्हणजे मुसलमान नेता पंतप्रधान बनू शकतो, असा तर्क अब्दुल्ला यांनी लावला आहे. Rishi Sunak can become Prime Minister in UK, Muslim will become Prime Minister in India too

    नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी काश्मिरी पंडितांच्या पलायनाच्या मुद्य्यावरही भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणाकडे तत्काळ लक्ष दिले पाहिजे. त्यांनी काश्मिरी पंडितांच्या लक्षित हत्या आणि अल्पसंख्याक हिंदूंचे पलायन या मुद्य्यांवर एक सर्वपक्षीय बैठक बोलावावी. पंतप्रधान नाहीतर किमान उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.



    अब्दुल्ला म्हणाले, “जर या प्रकरणी तत्काळ काही केले नाहीतर येणाऱ्या दिवसांमध्ये काश्मीर १०० % हिंदू रहित होऊ शकतो. काश्मिरी पंडितांसाठी १९९० सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. मी हत्यांसाठी जबाबदार नाही. मी कोणतही दहशतवादाला समर्थन करणारे विधान केलेले नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

    सरकारच्या दाव्याचा पर्दाफाश

    याशिवाय “काश्मीरमध्ये सामान्य परिस्थिती असल्याच्या केंद्र सरकारच्या मोठाल्या दाव्या पर्दाफाश झाला आहे. मी सरकारला सूचना करायला तयार आहे. मात्र सरकारने पहिले पाऊल उचलायला हवै आणि सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी. मी घाबरलेल्या काश्मिरी पंडितांना भेटण्यास जाईन, असंही ते म्हणाले.

    ब्रिटनमध्ये ऋषी सुनुक हे पंतप्रधान झाल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना अब्दुल्ला म्हणाले की, भारतात कधीच कोणता मुस्लीम व्यक्ती पंतप्रधान झालेला नाही. मात्र अशीही वेळ येईल जेव्हा मुसलमान व्यक्ती भारताचा पंतप्रधान बनेल.

    Rishi Sunak can become Prime Minister in UK, Muslim will become Prime Minister in India too

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??

    Indian Army पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतरच भारताने सध्या थांबविले फायरिंग; भारतीय सैन्य दलांचा स्पष्ट खुलासा; शस्त्रसंधी शब्द नाही वापरला!!