• Download App
    भर कार्यक्रमात रिचर्ड गेरने शिल्पा शेट्टीला किस केले आणि तिच्यावरच गुन्हा दाखल झाला, १५ वर्षांनंतर ठरली निर्दोष|Richard Gere kissed Shilpa Shetty during the show and she was convicted, acquitted after 15 years

    भर कार्यक्रमात रिचर्ड गेरने शिल्पा शेट्टीला किस केले आणि तिच्यावरच गुन्हा दाखल झाला, १५ वर्षांनंतर ठरली निर्दोष

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : एखाद्या महिलेकडे काही सेकंद रोखून पाहिले तर विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो. पण रिचर्ड गेर नावाच्या परदेशी अभिनेत्याने भर कार्यक्रमात अभिनेत्री शिल्पा शेट्टीला किस केले आणि उलट तिच्यावरच गुन्हा दाखल झाला. १५ वर्षांनंतर शिल्पा शेट्टी या खटल्यातून निर्दोष सुटली आहे.Richard Gere kissed Shilpa Shetty during the show and she was convicted, acquitted after 15 years

    2007 मध्ये राजस्थानमध्ये एका कार्यक्रमादरम्यान हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरेने शिल्पा शेट्टीला किस केले होते. यानंतर शिल्पा शेट्टीवर सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता. आता वर्षांनंतर या प्रकरणात न्यायालयाने शिल्पाची गुन्ह्यातून मुक्तता केली आहे.



    मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट केतकी चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर शिल्पा शेट्टीने आपली भूमिका स्पष्ट केली होती. पोलिसांचा अहवाल आणि सादर केलेल्या कागदपत्रांचा विचार केल्यानंतर, दंडाधिकाऱ्यांनी शिल्पावरील आरोप बिनबुडाचे असल्याचे समाधान मानले आणि त्यामुळे तिला माफ करून निर्दोष सोडण्यात आले.

    2007 मध्ये राजस्थानमध्ये घडलेल्या या घटनेनंतर अश्लिलता पसरवल्याप्रकरणी शिल्पा शेट्टीविरुद्ध राजस्थानमध्ये दोन आणि गाझियाबादमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर शिल्पा शेट्टीने प्रकरणे मुंबईत वर्ग करण्यासाठी याचिका दाखल केली. 2017 मध्ये त्यांच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली होती.

    शिल्पाच्या याचिकेत म्हटले आहे की, सहआरोपी रिचर्ड गेरे तिचे चुंबन घेत असताना तिने विरोध केला नाही, असा तिच्यावरचा आरोप आहे. केवळ या आधारावर त्याला कटकारस्थान किंवा गुन्हेगार ठरवता येणार नाही.

    2007 मध्ये शिल्पा शेट्टीने राजस्थानमध्ये एड्सबद्दल जनजागृती करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात भाग घेतला होता. या कार्यक्रमात अभिनेता रिचर्ड गेरेने शिल्पा शेट्टीचे जाहीर किस केले होते. त्यावेळी या प्रकरणावरून बराच वाद झाला होता आणि भारतीय न्यायालयाने शिल्पा शेट्टीविरोधात अटक वॉरंटही जारी केले होते.

    Richard Gere kissed Shilpa Shetty during the show and she was convicted, acquitted after 15 years

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य