reuters photojournalist danish siddiqui : रॉयटर्सचे फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दिकी यांची अफगाणिस्तानात हत्या करण्यात आली आहे. दानिश सिद्दिकी हे अफगाणिस्तानातील सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तेथे हजर होते. दानिश सिद्दीकी हे दिल्लीचे रहिवासी होते. अफगाणिस्तानाची वृत्तवाहिनी टोलो न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. कंधार प्रांतातील स्पिन बोल्दक भागात दानिश सिद्दीकी यांचे निधन झाले, ते तेथे कव्हरेजसाठी गेले होते. reuters photojournalist danish siddiqui killed in clashes in kandahar media reports
विशेष प्रतिनिधी
काबूल : रॉयटर्सचे फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दिकी यांची अफगाणिस्तानात हत्या करण्यात आली आहे. दानिश सिद्दिकी हे अफगाणिस्तानातील सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तेथे हजर होते. दानिश सिद्दीकी हे दिल्लीचे रहिवासी होते. अफगाणिस्तानाची वृत्तवाहिनी टोलो न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. कंधार प्रांतातील स्पिन बोल्दक भागात दानिश सिद्दीकी यांचे निधन झाले, ते तेथे कव्हरेजसाठी गेले होते.
अमेरिकेने सैन्य माघार सुरू केल्यापासून येथे भीषण हिंसाचार सुरूच आहे. सिद्दीकी हे गेल्या काही दिवसांपासून कंधारमधील वार्तांकनासाठी गेले होते. सिद्दीकी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात टीव्ही रिपोर्टर म्हणून केली आणि नंतर ते फोटो जर्नलिस्ट बनले.
दानिश सिद्दिकींनी आपले सहकारी अदनान अबीदी यांच्यासह 2018 मध्ये पुलित्झर पुरस्कार जिंकलेला आहे. त्यावेळी पुलित्झर पुरस्कार जिंकणारे ते पहिले भारतीय ठरले होते. दानिश यांनी रोहिंग्या निर्वासितांचे संकटही कव्हर केले होते.
दानिशने एमसीआरसी जामिया मिलिया इस्लामिया नवी दिल्ली येथून मास कम्युनिकेशनचा अभ्यासक्रम केला. त्यानंतर त्यांनी टीव्ही रिपोर्टर म्हणून वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्समध्ये काम केले. त्यानंतर तो फोटोग्राफीच्या क्षेत्राकडे वळले. दिल्लीत जन्मलेले आणि तेथेच लहानाचे मोठे झालेल्या दानिश यांचे कुटुंब जामिया विद्यापीठाजवळील गफर मंजिल येथे राहते. त्यांची पत्नी जर्मन असून त्यांना दोन मुले आहेत.
भारतातील अफगाणिस्तानचे राजदूत फरीद ममुंदझई यांनी दानिशबद्दल लिहिले की, “काल रात्री कंधार येथे मित्र दानिश सिद्दीकीच्या हत्येच्या दु:खद बातमीने मनापासून दु:ख झाले. दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा भारतीय पत्रकार आणि पुलित्झर पुरस्कार विजेते दानिश हे अफगाण सुरक्षा दलासोबत होते. काबूलला जाण्याच्या 2 आठवड्यांपूर्वी मी त्यांना भेटलो. त्यांनी फोटो जर्नलिझमची आवड आणि अफगाणिस्तानावरील प्रेमाबद्दल चर्चा केली. त्यांची कायम आठवण येईल. मी त्यांच्या कुटुंबीयांबद्दल आणि रॉयटर्सप्रति मनापासून संवेदना व्यक्त करतो
यापूर्वी, 13 जून रोजी दानिश सिद्दीकी यांनी ट्विट करून माहिती दिली होती की, ज्या गाडीमध्ये ते प्रवास करत होते त्यावर हल्ला झाला होता. त्यांनी लिहिले, “मी भाग्यवान आहे की मी सुखरूप राहिलो.”
अफगाणिस्तानात सध्या सुरू असलेल्या संकटाची माहिती देण्यासाठी गेलेले दानिश सिद्दीकी हे तेथील परिस्थिती सतत कॅमेर्यावर टिपून आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर करत होते.
reuters photojournalist danish siddiqui killed in clashes in kandahar media reports
महत्त्वाच्या बातम्या
- शासनाच्या उदासीनतेमुळे रखडली नोकरभरती, तब्बल 2 लाखांहून अधिक पदे रिक्त, RTI मधून धक्कादायक खुलासा
- तालिबानला पाहिजेत 15 वर्षांपुढील मुली आणि 45 पेक्षा कमी वयाच्या विधवा, मौलवींना मागितली यादी, दहशतवाद्यांशी लावणार लग्न
- जम्मू-काश्मिरात बकरीदला गाय व उंट यांच्या कुर्बानीवर बंदी, सरकारकडून आदेश जारी
- महामारीदरम्यान देशात UPIच्या माध्यमातून वाढले डिजिटल व्यवहार, गतवर्षी झाले 41 लाख कोटींचे ट्रान्झॅक्शन
- टी-सिरीजच्या भूषण कुमारविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल, काम देण्याच्या आमिषाने 30 वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप