पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ आता निवृत्ती सनदी अधिकारी आणि न्यायाधिश उतरले आहेत. मोदींना विद्वेषाच्या राजकारणावरून टीका करणारे खुले पत्र लिहिणाऱ्या माजी सनदी अधिकाऱ्यांना यातून चोख उत्तर दिले आहे. Retired Goverment Officers and Judges have now come out in support of Prime Minister Narendra Modi
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ आता निवृत्ती सनदी अधिकारी आणि न्यायाधिश उतरले आहेत. मोदींना विद्वेषाच्या राजकारणावरून टीका करणारे खुले पत्र लिहिणाऱ्या माजी सनदी अधिकाऱ्यांना यातून चोख उत्तर दिले आहे.
काही दिवसांपूर्वी मोदींवर टीका करणारे पत्र निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी लिहिले होते. हे पत्र राजकीय असून, मोदी सरकारविरुद्ध जनमत प्रतिकूल करण्याच्या त्यांच्या नियमित प्रयत्नांचा हा भाग असल्याची टीका कन्सर्न्ड सिटिझन्स या गटाने केले आहे. मोदीविरोधामागे प्रामाणिक भावना नसल्याचे कन्सर्न्ड सिटिझन्सने नमूद केले आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये चार राज्यांत मोदींच्या मागे भक्कम जनमत दिसल्याने आलेल्या निराशेपोटी मोदीविरोधी पत्र लिहिण्यात आल्याची टीकाही यात केली आहे.
या पत्रात नमूद केले आहे, की मोदी सरकारविरोधी पत्रात व्यक्त झालेला संताप आणि वेदनांमागे निव्वळ शुद्ध भावना नाहीत. खरे तर मोदी सरकारविरोधात द्वेषभावना वाढीस लागावी म्हणून खतपाणी घालण्याचे काम करून संघर्ष उभा करण्याच्या प्रयत्नांचा हा भाग आहे. यामागे त्यांचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन उघडपणे दिसतो व त्याद्वारे ते खोटे चित्र रंगवत आहेत. या पत्रातील भाषा नेहमीच सारखे तेच भाव आळवत असते.
त्यात नेहमीचा सूर, पक्षपाती शब्दयोजना दिसते. त्यामागील विचारसरणीची बांधिलकी त्यातून उघड होते. पाश्चात्या प्रसारमाध्यमांनी मोदी सरकारविरोधातील वृत्तांकनात वापरलेले शब्द, अभिव्यक्ती आणि यांच्या पत्रातील शब्दयोजना व भाषेत कमालीचे साम्य दिसते. त्यामुळे या गटाचा यामागचा हेतू शुद्ध नसल्याचे स्पष्ट होते. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल मौन बाळगण्यात आले आहे. भाजपेतर पक्ष ज्या राज्यांत सत्तेत आहेत, तेथील हिंसाचार त्यांच्या पत्रांतून सोयीस्कररित्या वगळण्यात आला आहे. यावरून त्यांचा मूल्यहीन व तऱ्हेवाईक दृष्टिकोन स्पष्ट होतो, अशी टीकाही कन्सर्न्ड सिटिझन्सने या पत्रात केली आहे.
मोदी यांच्या समर्थनार्थ पत्र लिहिणाऱ्यांत सिक्कीम उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश प्रमोद कोहली, माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल व शशांक, लष्कराची गुप्तहेर संघटना रॉचे माजी प्रमुख संजीव त्रिपाठी यांचा समावेश आहे. एकूण आठ निवृत्त न्यायाधीश, ९७ माजी सनदी अधिकारी आणि ९२ निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी या खुल्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.
Retired Goverment Officers and Judges have now come out in support of Prime Minister Narendra Modi
महत्त्वाच्या बातम्या
- Raj Thackeray : मशिदींवरचे भोंगे उतरलेच पाहिजेत, अन्यथा महाराष्ट्रातल्या मनगटातील ताकद दाखवू; राज ठाकरेंची गर्जना!!
- Devendra Fadanavis : मशिदींवरचे भोंगे उतरवताना हातभर फाटली आणि म्हणे “यांनी” बाबरी मशीद पाडली!!; उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!!
- AAP Mumbai : ठाकरे बंधूंच्या घमासानाला तोंड देण्यासाठी आम आदमी पार्टीची जबाबदारी प्रीती शर्मा – मेननवर!!