• Download App
    ३१ डिसेंबरला सार्वजनिक ठिकाणी निर्बंध लागू; पार्ट्यांना बंदी ; मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती|Restrictions in public places on December 31; Parties banned; Information of Minister Aditya Thackeray

    ३१ डिसेंबरला सार्वजनिक ठिकाणी निर्बंध लागू; पार्ट्यांना बंदी ; मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ‘ओमिक्रॉनचा विषाणू कसा आहे, हे डॉक्टरांना ठरवू द्या’,असे सांगत मंत्री आदित्य ठाकरे यांनी ३१ डिसेंबर किंवा न्यू ईयरच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी निर्बंध लागू केले जातील, असे सांगितले.Restrictions in public places on December 31; Parties banned; Information of Minister Aditya Thackeray

    एखाद्या इमारतीत १० पेक्षा जास्त व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास ती संपूर्ण इमारत पुढील पंधरा दिवस सील केली जाईल.सार्वजनिक ठिकाणी पार्ट्या होणार नाहीत. ३१ डिसेंबर किंवा न्यू ईयरच्या पार्श्वभूमीवर कोणीही पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊन कार्यक्रम करू नयेत,



     

    असेही आदित्य ठाकरेंनी सांगितले. मुंबईत ५८ हजार बेड्स उपलब्ध आहेत. मात्र नागरिकांनी गरज असल्याशिवाय बाहेर पडणे टाळावे. कोराना केसेस वाढल्या तरी पॅनिक होऊ नका. शाळा, कॉलेजसंदर्भात निर्णय घेण्यासाठी पालक किंवा डॉक्टरांनी कोणतीही मागणी केलेली नाही. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय आणखी दोन दिवसांनी घेतला जाईल.

    महाराष्ट्रात मागील आठवड्यापासून अचानक कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असून ही चिंताजनक बाब आहे. ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांनी गंभीरपणे ही स्थिती हाताळावी,

    असे निर्देश पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच कोणत्या स्थितीत मुंबईतील इमारती सील करायच्या, मुंबईत कोणत्या पार्ट्यांवर बंदी आहे, या सगळ्याविषयी आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले.

    Restrictions in public places on December 31; Parties banned; Information of Minister Aditya Thackeray

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!