• Download App
    पुणे,मुंबईसह 14 जिल्ह्यात निर्बंध शिथिल ; रेस्टॉरंट आणि सिनेमागृहांना सवलत Restrictions begin to be relaxed in Maharashtra

    पुणे,मुंबईसह 14 जिल्ह्यात निर्बंध शिथिल ; रेस्टॉरंट आणि सिनेमागृहांना सवलत

     

    मुंबई : कोरोना नियंत्रणात आल्यावर महाराष्ट्र सरकारने निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. ही सवलत सध्या 14 जिल्ह्यांसाठी लागू करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई,पुण्याचा समावेश आहे. Restrictions begin to be relaxed in Maharashtra

    मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या चौदा जिल्ह्यांत निर्बंध शिथील होतील. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहेत.

    14 जिल्ह्यांमध्ये 100 टक्के क्षमतेने जलतरण तलाव, धार्मिक स्थळे आणि मनोरंजन पार्क सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी रेस्टॉरंट्स आणि सिनेमा हॉल 100 टक्के क्षमतेने सुरू होणार आहेत. सिनेमा हॉल, बार-रेस्टॉरंट, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळ, नाट्य गृह, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क याठिकाणी 100 क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे

    राज्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने कमी होत आहेत. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतरच राज्य सरकारने महाराष्ट्रातील रेस्टॉरंट, चित्रपटगृह आणि सिनेमागृहांना सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे

    Restrictions begin to be relaxed in Maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार