विशेष प्रतिनिधी
दिल्ली : पुण्यातील प्रसिद्ध लेखिका आणि वक्त्या शेफाली वैद्य यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होताना दिसून येतोय. या मागचं कारण असं की या व्हिडिओमध्ये एक ‘भारतीय’ महिला ‘भारतीय’ रेस्टॉरंटमध्ये साडी नेसून गेल्यानंतर तिला साडी हे स्मार्ट वेअर नाही हे कारण देऊन रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. या व्हिडीओ मध्ये ती महिला रेस्टॉरंटमधील माणसांसोबत ह्या मुद्यावरून वाद घालतानाही दिसून येतेय.
Restaurant denied entry to woman, restaurant says,’saree is not a smart wear’
शेफाली वैद्य यांनी हा व्हिडीओ शेअर करत अतिशय खेदजनक कॅप्शन शेअर केले आहे. त्या म्हणतात, ‘मी अमेरिका, दुबई अश्या देशातील मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये साडी नेसून जेवायला गेलीये. पण तिथे कोणीही मला साडी स्मार्ट वेअर नाही असे सांगितले नाही. तर भारतात असं का केलं जातंय? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
शेफाली वैद्य आपल्या सोशल मीडियाद्वारे साड्या आणि भारतीय पारंपारिक वेशभूषा यासंदर्भातील माहिती शेअर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्याच महिन्यात त्यांना वस्त्र उद्योग मंत्रालयाद्वारे गठित करण्यात आलेल्या एक विशेष समितीवर सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
अनिता चौधरी नावाच्या एका महिलेनं हा व्हिडीओ आपल्या अकाउंटवर ट्वीट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महिला आयोगाला ह्या पोस्टमध्ये टॅग केले आहे. आता आम्ही साडी नेसणंही सोडलं पाहिजे का? हा प्रश्नही उपस्थित केला आहे.
Restaurant denied entry to woman, restaurant says,’saree is not a smart wear’
महत्त्वाच्या बातम्या
- रजनी पाटलांची राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न; काँग्रेसला कोणाकडून दगाफटक्याची भीती वाटतेय??
- शाहरुख खानच्या चित्रपट फॅनसाठी सर्वोच्च न्यायालयाने यशराज फिल्म्सला फटकारले, ठोठावला 15 हजारांचा दंड
- यूपी एटीएस खुलासा : धर्मांतराची देशव्यापी सिंडिकेट चालवल्याबद्दल मौलानाला अटक, बहरीनकडून ट्रस्टला मिळाले 1.5 कोटी रुपये
- कॅलिकत युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना द्यावा लागणारा ‘हुंडा घेणार नसल्याचा’ बॉंड