• Download App
    व्यक्तीकडून केवळ छळ केला म्हणून तो आत्महत्येसाठी जबाबदार नाही - कोर्टाचा निर्वाळा| responsible for suicide just because he was tortured by the person - the court's nirvana

    व्यक्तीकडून केवळ छळ केला म्हणून तो आत्महत्येसाठी जबाबदार नाही – कोर्टाचा निर्वाळा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – एखाद्या व्यक्तीने केवळ छळ केला म्हणून तिने आत्महत्येसाठी चिथावणी दिली असे म्हणता येणार नाही, असे सांगतानाच सर्वोच्च न्यायालयाने यासाठी छळ करणाऱ्या व्यक्तीकडून तसे कृत्य होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. responsible for suicide just because he was tortured by the person – the court’s nirvana

    विष प्राशन करून आत्महत्या केल्याच्या प्रकरणी न्यायालयात आज सुनावणी झाली. या व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी चार चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या. वैवाहिक समस्यांमुळे आपण आत्महत्या करत आहोत असे तिने म्हटले होते.



    आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीने पत्नी आणि तिच्या नातेवाइकांवर छळाचा ठपका ठेवला होता. याप्रकरणी संबंधित व्यक्तीच्या नातेवाइकांनी न्यायालयात याचिका दाखल करत पत्नी आणि तिच्या नातेवाइकांवर कारवाईची मागणी केली होती.

    न्या. एल. नागेश्वचरराव आणि न्या. अनिरुद्ध बोस यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी पार पडली. चिथावणी देणाऱ्या व्यक्तीनेही समोरच्या व्यक्तीसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच ठेवला नसेल किंवा तशी परिस्थिती निर्माण केली असेल तरच त्या व्यक्तीवर या कलमांतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.

    responsible for suicide just because he was tortured by the person – the court’s nirvana

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!