• Download App
    अटल पेन्शन योजनेला वाढू लागला प्रतिसाद, वर्षात 71 लाख लोकांनी सुरू केला सहभाग|Response to the Atal Pension Scheme began to grow, with 71 lakh people participating in the year

    अटल पेन्शन योजनेला वाढू लागला प्रतिसाद, वर्षात 71 लाख लोकांनी सुरू केला सहभाग

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आयुष्याची सायंकाळ सुखसमाधानाने आणि आर्थिक स्वयंपूर्ण होऊन जगण्यासाठी मोदी सरकारने सुरू केलेल्या अटल पेन्शन योजनेला लोकांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 24 जानेवारीपर्यंत 71 लाखांहून अधिक लोक त्याच्याशी जोडले गेले आहेत.Response to the Atal Pension Scheme began to grow, with 71 lakh people participating in the year

    केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. बी.के. कराड यांनी राज्यसभेत सांगितले की, 24 जानेवारी 2022 पर्यंत अढ अंतर्गत 71,06,743 सदस्य जोडले गेले. 2020-21 या आर्थिक वर्षात 79 लाखांहून अधिक ग्राहक या योजनेशी जोडले गेले होते. 2018-19 मध्ये 70 लाख लोक जोडले गेले होते. या योजनेत सामील होणाऱ्यांची संख्या 3.75 कोटींच्या पुढे गेली आहे.



    अटल पेन्शन योजनेंतर्गत, वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर, दरमहा 1000 ते 5000 रुपये पेन्शन मिळते. यामध्ये 18 वर्षे ते 40 वयोगटातील व्यक्ती गुंतवणूक करू शकतात. जर एखाद्या व्यक्तीने ही योजना घेतली तर त्याला किमान 20 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. योजनेत सामील होण्यासाठी, बचत बँक खाते, आधार आणि अ‍ॅक्टिव्ह मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे. दरमहा 1 ते 5 हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी ग्राहकाला 42 ते 210 रुपये दरमहा द्यावे लागतील.

    निवृत्तीनंतर तुम्हाला किती पेन्शन हवी आहे यावर किती रक्कम कापली जाईल हे अवलंबून असेल. दरमहा 1 ते 5 हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी ग्राहकाला 42 ते 210 रुपये दरमहा द्यावे लागतील. वयाच्या 18 व्या वर्षी योजना घेतल्यावर हे होईल.जर एखाद्या ग्राहकाने वयाच्या 40 व्या वर्षी ही योजना घेतली

    तर त्याला 291 रुपये ते 1454 रुपये प्रति महिना मासिक कंट्रीब्यूशन द्यावे लागेल. ग्राहक जितका जास्त कंट्रीब्यूशन देईल तितकी जास्त निवृत्तीनंतर त्याला पेन्शन मिळेल. यामध्ये तुम्ही कलम 80उ अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स बेनीफिट क्लेम करू शकता.

    या योजनेअंतर्गत, गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक किंवा अर्ध-वार्षिक म्हणजेच 6 महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूक करू शकतात. योगदान ऑटो-डेबिट केले जाईल. निश्चित रक्कम तुमच्या खात्यातून आपोआप कापली जाईल आणि तुमच्या पेन्शन खात्यात जमा केली जाईल.

    Response to the Atal Pension Scheme began to grow, with 71 lakh people participating in the year

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य