जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपाचे कोणतेही नुकसान झाले नाही. असंह शाह यांनी म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
हासन : कर्नाटकातील हासन येथे एका निवडणूक रॅलीत गृहमंत्री अमित शहा यांनी जेडीएस आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. शाह म्हणाले, ‘’धर्माच्या आधारावर आरक्षण हे असंवैधानिक आहे आणि आम्ही 4% मुस्लिम आरक्षणावर जे काही बोललो ते आम्ही जमिनीवर लागू करू. यावर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी.’’ Reservation on the basis of religion is unconstitutional Amit Shah gave big hints in Karnataka
याशिवाय ते रॅलीदरम्यान म्हणाले, ‘जेडीएस हा परिवारवादी पक्ष आहे आणि सत्तेसाठी काँग्रेसशी हातमिळवणी करतो. आमच्या दोन लिंगायत नेत्यांच्या समावेशामुळे काँग्रेस थोडी खूश आहे, पण काँग्रेसला लिंगायतांसाठी बोलण्याचा अधिकार नाही. कर्नाटकच्या इतिहासात त्यांनी राज्यात लिंगायत नेतृत्वाला केवळ दोनदाच संधी दिली आहे आणि दोघेही त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. पूर्वी एका मुख्यमंत्र्यास इंदिरा गांधींनी तर दुसऱ्या मुख्यमंत्र्यास राजीव गांधी यांनी हटवले होता.
जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल शहा म्हणाले, “जगदीश शेट्टर निवडणूक हरणार आहेत, त्यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपाचे कोणतेही नुकसान झाले नाही आणि त्यांना भाजपमधून काढून टाकण्याचे कारण माहित आहे.” तसेच, ‘’आम्ही जिंकण्याची क्षमता आणि गुणवत्तेच्या आधारावर तिकिटे वाटली आहेत. आम्ही पक्ष जेडीएस सारख्या कोणत्याही कुटुंबाकडे सोपवला नाही.निवडणुकीनंतर काँग्रेस आणि जेडीएस दोघेही युती करतील, ही दोन्ही पक्षांची सामान्य रणनीती आहे, त्यामुळे भाजपाला निवडा आणि पूर्ण बहुमत द्या, आम्ही पंतप्रधानांच्या आदर्शांचे अनुसरण करू आणि राज्याचा विकास करू.’’
Reservation on the basis of religion is unconstitutional Amit Shah gave big hints in Karnataka
महत्वाच्या बातम्या
- कुपोषण संपवण्यासाठी राज्य सरकारची अनोखी मोहीम; अन्नाचा दर्जा तपासणाऱ्या ‘AI’ यंत्राचं लोकार्पण
- आसाम युवक काँग्रेसच्या महिला अध्यक्षाला छळणाऱ्या युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षांविरुद्ध आसाम पोलिसांची कठोर कायदेशीर कारवाई
- जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा देताना खासदार अमोल कोल्हेंनी दाखविली राजकीय प्रवासाची सूचक दिशा!!
- बुलढाण्याच्या भेंडवळ घटमांडणीचे भाकीत : राजा कायम राहणार, पण रोगराई पसरण्याची धोका, वाचा पावसाचा अंदाज