• Download App
    आसामचे मुख्यमंत्री व्हीआयपी कल्चरवर संतापले!!; ट्रॅफिक अडवले म्हणून अधिकाऱ्यांना भर रस्त्यावर झापले!! reprimanded officials concerned for halting traffic for me, despite clear direction not to create

    आसामचे मुख्यमंत्री व्हीआयपी कल्चरवर संतापले!!; ट्रॅफिक अडवले म्हणून अधिकाऱ्यांना भर रस्त्यावर झापले!!

    वृत्तसंस्था

    गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा आज व्हीआयपी कल्चरवर प्रचंड संतापले. त्यांच्या दौऱ्याच्या वेळी पोलीस अधिकाऱ्यांनी वाहतूक अडवून ठेवली. ट्रॅफिक जाम झाला म्हणून रस्त्यावर उतरून हेमंत विश्वशर्मा यांनी अधिकाऱ्यांना सर्वांसमोर झापले.reprimanded officials concerned for halting traffic for me, despite clear direction not to create

    गोमतगाव परिसरात मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा हे आसाम राज्य महामार्गाच्या शिलान्यास कार्यक्रमाला गेले होते. शिलान्यास कार्यक्रम आटोपून ते निघाले असताना त्यांना एके ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम दिसले. यासंदर्भात अधिक चौकशी केली असता आपलाच म्हणजे मुख्यमंत्र्यांचा ताफा रस्त्यावरून जात असल्यामुळे वाहतूक आडवल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. या ट्रॅफिक जाम मध्ये एक ऍम्ब्युलन्स देखील अडकली होती.

    आपल्या दौऱ्यामुळे ट्राफिक जाम झाल्याचे समजताच मुख्यमंत्री विश्वशर्मा आपल्या गाडीतून उतरले आणि त्यांनी वाहतूक पोलिसांच्या एसपीना बोलवायला सांगितले. त्यावेळी तिथे अनेक वरिष्ठ अधिकारी आले. हेमंत विश्व शर्मा सर्वांसमोर संबंधित अधिकाऱ्यांना खडसावून म्हणाले, की हे काय चालले आहे? माझ्या दौर्‍यात तुम्हाला गाड्या अडवून ट्रॅफिक जाम करायला कोणी सांगितले? रस्त्यावरून कोणी राजा-महाराजा चालला आहे का? लोकांची गैरसोय कशाला करता? ताबडतोब वाहतूक मोकळी करा आसाममध्ये इथून पुढे असले व्हीआयपी कल्चर खपवून घेतले जाणार नाही. लोकांची गैरसोय कोणत्याही व्हीआयपी समोर होता कामा नये, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. यासंदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

    reprimanded officials concerned for halting traffic for me, despite clear direction not to create

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!