• Download App
    ट्विटर वर ट्रेंड!!; पुलवामा हल्ल्याचे स्मरण; व्हॅलेन्टाइन डे नको!!Reminiscences of the Pulwama attack

    #PulwamaAttack, #Blackday : ट्विटर वर ट्रेंड!!; पुलवामा हल्ल्याचे स्मरण; व्हॅलेन्टाइन डे नको!!

    प्रतिनिधी नवी

    दिल्ली : आज 14 फेब्रुवारी दिनी जगभरातील लोक व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात व्यग्र असताना, भारतातील लोक व्हॅलेंटाईन डे ऐवजी पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या वीर जवानांचे स्मरण करत आहेत. आजचा दिवस हा भारतासाठी काळा दिवस असून, हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहणे आपलं कर्तव्य आहे, असे म्हणत भारतातील नागरिकांनी ट्विटरवर ट्रेंड सुरु केला आहे. आजचा दिवस हा भारतासाठी काळा दिवस असल्याचं, नेटिझननी म्हटले आहे.Reminiscences of the Pulwama attack

    या ट्रेंडमधील काही ट्विट

    एका नेटक-याने ट्विट करत म्हटलंय की, मी त्या सर्व भारतीयांचा निषेध करतो, जे पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना विसरतात, पण व्हॅलेंटाईन डे आठवणीने साजरा करतात. पण आपण भारतीयांनी हुतात्म्यांचे स्मरण केले पाहिजे.

    कुमार नीरज या नेटक-याने आजच्या दिवशी आपण आपल्या 40 बहादूर जवानांना गमावलं. हा देशातील एक काळा दिवस असल्याचे म्हटले आहे.

    #14_FEBRUARY_2019
    THE DAY WHEN WE LOST 40 BRAVEHEARTS OF CRPF IN A COWARDLY SUICIDE ATTACK IN #PULWAMA. ITS A NATIONAL #BLACKDAY. LETS LIGHT A CANDLE FOR ALL THE BRAVEHEARTS WHO LOST THEIR LIVES FIGHTING FOR US. PIC.TWITTER.COM/HEPPARBVF3

    — कुमार नीरज (@KUMAR_NIRAJ) FEBRUARY 13, 2022

    रिदानशि नावाच्या नेटक-याने म्हटलयं की मी व्हॅलेंटाईन डे साठी उत्सुक नाही,याच कारण मी एकटा आहे असं नाही, तर  तर पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांचे स्मरण करण्याचा हा आजचा दिवस आहे.

    I AM NOT EXCITED FOR VALENTINE’S DAY
    NOT BECAUSE I AM SINGLE BUT BECAUSE I REMEMBER THE PULWAMA ATTACK ………#BLACKDAY #PULWAMAATTACKPIC.TWITTER.COM/ZEXNNFTYNN

    — 𝐑𝐲𝐝𝐚𝐧𝐬𝐡𝐢 ( रिदानशि ) (@RYDANSHI) FEBRUARY 13, 2022

    मनिषा राय नावाच्या ट्विटर युजरने या काळ्या दिवसाच्या आठवणीत लिहिलयं की, आम्ही हा दिवस विसरणार तर नाहीच पण माफही करणार नाही. भारतातील वीर जवानांना सल्युट असं म्हणत तिने हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    असा झाला होता पुलवामा हल्ला

    जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याला सोमवारी तीन वर्षे पूर्ण झाली. 14 फेब्रुवारी 2019 रोजी, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून सुमारे 2 हजार 500 जवानांना घेऊन, सीआरपीएफचा ताफा 78 बसमधून जात होता. त्या दिवशीही रस्त्यावर सामान्य वाहतूक होती. सीआरपीएफचा ताफा पुलवामाला पोहोचला होता, तेव्हा रस्त्याच्या पलीकडून येणारी एक कार सीआरपीएफच्या ताफ्यासोबत जाणाऱ्या वाहनावर आदळली. समोरून येणारी एसयूव्ही जवानांच्या ताफ्याला धडकताच तिचा स्फोट झाला. या प्राणघातक हल्ल्यात 40 शूर सीआरपीएफ जवान हुतात्मा झाले.

    Reminiscences of the Pulwama attack

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य