• Download App
    रेमडेसिव्हिरची कमतरता भासणार नाही, इतर देशांकडून आयात सुरू; 75000 व्हायल्सची पहिली खेप आज भारतात पोहोचणार । remdesivir import started; first consignment of 75000 vials will reach India today

    रेमडेसिव्हिरची कमतरता भासणार नाही, इतर देशांतून आयात सुरू; ७५००० व्हायल्सची पहिली खेप आज भारतात पोहोचणार

    remdesivir import : देशात कोरोना महमारीमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची कमतरतादेखील देशात कायम आहे. एवढेच नव्हे तर गेल्या अनेक दिवसांपासून या इंजेक्शनच्या ब्लॅक मार्केटिंगच्या बातम्याही ऐकायला मिळाल्या. देशातील रेमडेसिव्हिरची कमतरता दूर करण्यासाठी आता भारत सरकारने इतर देशांमधून रेमडेसिव्हिर या महत्त्वाच्या औषधाची आयात करण्यास सुरुवात केली आहे. 75000 कुप्यांची पहिली खेप आज भारतात पोहोचेल, अशी माहिती भारत सरकारने दिली. remdesivir import started; first consignment of 75000 vials will reach India today


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात कोरोना महमारीमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची कमतरतादेखील देशात कायम आहे. एवढेच नव्हे तर गेल्या अनेक दिवसांपासून या इंजेक्शनच्या ब्लॅक मार्केटिंगच्या बातम्याही ऐकायला मिळाल्या. देशातील रेमडेसिव्हिरची कमतरता दूर करण्यासाठी आता भारत सरकारने इतर देशांमधून रेमडेसिव्हिर या महत्त्वाच्या औषधाची आयात करण्यास सुरुवात केली आहे. 75000 कुप्यांची पहिली खेप आज भारतात पोहोचेल, अशी माहिती भारत सरकारने दिली.

    एचएलएल लाइफकेयर लिमिटेड या भारत सरकारच्या मालकीच्या कंपनीने गिलियड सायन्सेस इंक. यूएसए आणि इजिप्शियन फार्मा कंपनी, ईव्हा फार्माच्या 4,50,000 कुप्यांची ऑर्डर दिली आहे. गिलियड सायन्सेस इंक यूएसए येत्या एक-दोन दिवसांत 75,000 ते 1 लाख कुप्या भारतात पाठवेल, अशी आशा आहे.

    दरम्यान, सध्या देश अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे. कोरोनाच्या लाटेने अनेक बळी घेतले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तीन लाखांहून अधिक रुग्णांची सातत्याने नोंद होत आहे. याबरोबरच मृतांच्या वाढत्या संख्येनेही चिंता वाढवली आहे.

    remdesivir import started; first consignment of 75000 vials will reach India today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!