मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजने यंदाच्या तिमाहीत गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट नफा झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळात १३,२२७ कोटी रुपये नफा झाला आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये याच काळात ६,३४८ कोटी नफा झाला होता.Reliance Industries reported double profit in the first quarter of this year
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजने यंदाच्या तिमाहीत गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट नफा झाला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजला जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळात १३,२२७ कोटी रुपये नफा झाला आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये याच काळात ६,३४८ कोटी नफा झाला होता.
- महाराष्ट्रासह अनेक राज्यांना रिलायन्सच्या मुकेश अंबानींकडून प्राणवायू, दररोज ७०० टन ऑक्सिजनचा पुरवठा
टेलीकॉम, किरकोळ व्यापार आणि तेलउद्योगाचा या नफ्यामध्ये मोठा वाटा आहे. यंदाच्या वर्षी तेलउद्योगातून रिलायन्सला जास्त फायदा झाला. मार्च २०२१ मध्ये संपलेल्या वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजचा महसूल कमी झाला होता.
याचे कारण म्हणजे कंपनीचा एकूण आर्थिक व्यवहार ५.९८ ट्रिलीयनवरून ४.६ ट्रिलीयनवर घसरला होता. ही घसरण मुख्यत: कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये झालेली होती. कंपनीचा एकूण नफा ४९,१२८ कोटी रुपये आहे. त्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा २४.८ टक्यांनी वाढ झाली आहे.
Reliance Industries reported double profit in the first quarter of this year
महत्त्वाच्या बातम्या
- उपचार घेत असलेल्या रुग्णांना दिलासा, कोरोना संदर्भातील विम्याचे दावे एक तासाच्या आता निकाली निघणार
- भारतीय सीईओ देशाच्या मदतीला, मास्टर कार्डने भारताला केली ७५ कोटी रुपयांची मदत
- बिल गेटस यांच्यावर भारतविरोधी वक्तव्यावर टीकेचा भडिमार
- कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी लष्कराला विशेष आर्थिक अधिकार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची घोषणा