• Download App
    रिलायन्स इंडस्ट्रीला मिळाला १८ हजार ५४९ कोटी रुपये नफा, निव्वळ नफ्यात ४१ टक्यांनी वाढ|Reliance Industries got 18 thousand 549 crore profit, net profit 41 persent

    रिलायन्स इंडस्ट्रीला मिळाला १८ हजार ५४९ कोटी रुपये नफा, निव्वळ नफ्यात ४१ टक्यांनी वाढ

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजने चालू आर्थिक वर्षाच्या तिसºया तिमाहीत 18, 549 कोटींचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात 41.5 टक्यांनी वाढ झाली आहे.आर्थिक वर्ष २०२२ च्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स जिओचा निव्वळ नफा 3,615 कोटी रुपये होता. तिसºया तिमाहीत कंपनीचा महसूल 19,347 कोटी रुपये इतका राहिला.Reliance Industries got 18 thousand 549 crore profit, net profit 41 persent

    या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीचा एकत्रित महसूल 54. 25 टक्यांनी वाढून 191271 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत एकत्रित महसूल 1,23,997 कोटी रुपये इतका होता. कंपनीचा निव्वळ नफा मार्जिन 9.8 टक्के राहिला आहे. त्या तुलनेत कंपनीचा निव्वळ नफा मार्जिन सप्टेंबरच्या तिमाहीत 8.1 टक्के आणि एका वषार्पूर्वी याच तिमाहीत 10. 8 टक्के होता.



    तेल, रिटेल तसेच दूरसंचार क्षेत्रातील चांगल्या कामगिरीमुळेच आर्थिक वर्ष 2022 च्या तिसºया तिमाहीमध्ये चांगला नफा झाल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, आॅक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत निव्वळ नफा 18,549 कोटी रुपये इतका होता.

    वर्षभरापूर्वी याच तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्याचे प्रमाण 13,101 कोटी रुपये इतके होते. कंपनीने म्हटले आहे की 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत समूहाच्या कामकाजावर कोणताही मोठा परिणाम झाला नाही. या तिमाहीत कंपनीचा एइकळऊअ 29.9 टक्क्यांनी वाढून 33,886 कोटी रुपये झाला आहे. तसेच कंपनीच्या शेअरमध्ये देखील 18.26 टक्क्यांची वाढ झाली आहे.

    कंपनीने केलेल्या दाव्यानुसार , रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्मचा एकत्रित नफा 8.9 टक्क्यांनी वाढून 3,795 कोटी रुपये झाला आहे. या विभागातील कंपनीचा एकूण महसूल 13.8 टक्क्यांनी वाढून 24,176 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

    या विभागासाठी त्याचा एबिटा 18 टक्क्यांनी वाढून 10,008 कोटी रुपये झाला आहे. तर, त्याचा रोख नफा 14,7 टक्क्यांनी वाढून 8747 कोटी रुपये इतका झाला आहे. या तिमाहीत जिओने एकूण 102 कोटी नवे ग्राहक जोडले असून, जिओच्या एकूण सदस्यांची संख्या 4.21 कोटींवर पोहचली आहे.

    Reliance Industries got 18 thousand 549 crore profit, net profit 41 persent

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका